शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूरमध्ये वह्या वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूरमध्ये वह्या वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर :- पोलादपूर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोरोनासारख्या कठीण काळात देवदूताप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुटुंब प्रमुखाप्रमाणे कणखरपणे पार पाडणाऱ्या उद्धवजी ठाकरे यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

हा कार्यक्रम शिवसेना पोलादपूर शहरतर्फे आयोजित करण्यात आला होता. पोलादपूरचे सुपुत्र व शिवसेना अंधेरी मुंबई विधानसभा संघटक श्री. संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष सहकार्याने वाह वाटप या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास मातोश्री एकनिष्ठ विधानसभा संघटक ॲड. सारिका शेखर पालकर, तालुका संघटिका सौ. अश्विनी संदीप गांधी, पोलादपूर शहरप्रमुख श्री. निलेश अशोक सुतार, युवा सेना अधिकारी श्री. अमरदीप मंगेश नगरकर, महिला शहर संघटिका सौ. वैशाली संतोष चिकने, युवा सेना संपर्कप्रमुख अभिषेक साळुंखे, युवा नेते संजय मोहिते, विभाग संघटक संतोष चिकने, विकास येरूणकर, राजेंद्र साळवी,संजय मोहिते, नहीम धामणकर,स्वप्नील मोरे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला गेला, तर वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमांचे कौतुक करत शिवसेनेच्या सामाजिक भान दर्शवणाऱ्या कार्यपद्धतीचे अभिनंदन केले.