डॉ.सचिन राउळ यांच्यासह नागावच्या युवावर्ग व ग्रामस्थ शिवसेनेत पक्ष प्रवेश
आमदार महेंद्र दळवी यांनी केले स्वागत
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- सामाजीक व किडा क्षेत्रात अल्पावधीत प्रसिध्दीस आलेले नागावचे प्रसिध्द उदयोजक व युवा नेतृत्व अशी ओळख असलेले डॉ. सचिन राउळ यांनी नागावच्या युवावर्ग व ग्रामस्थांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
अलिबाग-राजमळा येथील अलिबाग विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी डॉ. सचिन राउळ व नागाव युवावर्ग तसेच ग्रामस्थ यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचे सह माजी जि.प.सदस्या मानसीताई दळवी,शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी,उपजिल्हा प्रमुख शैलेश चव्हाण,शिवसेना रायगड जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे, शिवसेना कामगार नेते दिपक रानवडे, शिवसेना रायगड जिल्हा महिला संघटिका संजिवनी नाईक, महिला विधानसभा संघटिका तनुजा मोरे, चौल महिला विभाग प्रमुख ज्योती मुंबईकर आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मोठया संख्येने सचिन राउळ मित्रपरिवार व हितचिंतक व नागाव युवावर्ग, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रारंभी नागावचे प्रसिध्द उदयोजक व युवा नेतृत्व अशी ओळख असलेले डॉ. सचिन राउळ यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला, आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांना शाल,श्रीफळ, पुष्पगूच्छासह भगवी शाल प्रदान करून शिवसेना पक्षात स्वागत केले. यावेळी सचिन राउळ यांचेसह सदस्य परेश ठाकूर, सदस्य रोहन नाईक, व्यावसायीक राकेश राणे, व्यावसायीक आदित्य भगत, चौल भगवती व्यावसायीक मंदार वर्तक, व्यावसायीक प्रितेश घरत आदीने सुध्दा शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश घेतला. आमदार महेंद्र दळवी यांनी या सर्वाचे स्वागत शाल,श्रीफळ, पुष्पगूच्छ व भगवी शाल परिधान करून केले.
यावेळी चौल शिवसेना पदाधिकारी व उदयोजक डॉ. सचिन राउळ यांनी चौल-आग्राव रस्ताचे काम त्वरीत मार्गाी लावण्याची मागणी केली, त्यानुसार आमदार महेंद्र दळवी यांनी चौल-आग्राव रस्ता नुतनीकरणाचे काम त्वरीत करण्यासाठी संबधीत अधिकारी वर्गास सुचना दिल्या.