मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी (भाजपा) रायगड जिल्हा यांच्यातर्फे शनिवारी (दि.२६ ) आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
भाजपा दक्षिण रायगड जिल्हा कार्यालय, अलिबाग येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाने तांत्रिक सहकार्य लाभलेल्या या रक्तदान शिबिरात ७५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
भाजपा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस सतिश धारप, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस एड. महेश मोहिते, भाजपा अलिबाग शहर अध्यक्ष एड. अंकित बंगेरा, भाजपा सहकार आघाडी कोकण विभाग सहसंयोजक गिरीश तुळपुळे, भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. चित्रा पाटील , रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष एड. आस्वाद पाटील, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सवाई पाटील, भाजपा दक्षिण अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे, मध्य अलिबाग तालुका अध्यक्ष रोशन भगत, उत्तर अलिबाग तालुका अध्यक्ष चेतन पाटील, हेमंत दांडेकर, सुनिल दामले, संकेत जोशी, विश्वास जोशी, उदय काठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शासकीय रक्तकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.