वानोळा ते पाचोंदा रस्ता चिखलमय,गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हे दाखल करा जनतेतून मागणी

वानोळा ते पाचोंदा रस्ता चिखलमय,गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हे दाखल करा जनतेतून मागणी

 

आदित्य खंदारे
माहूर प्रतिनिधी
7350030243

माहूर :- तालुक्यातील वानोळा ते पाचुंदा दरम्यान दोन किलोमीटरचे रस्त्याचे रुंदीकरण व मजबुती करण्याचे काम माहूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत शारदा कंट्रक्शन कंपनी द्वारे करण्यात येत होते गुत्तेदराने चांगला रस्ता जेसीबी द्वारे उखडून काढला व त्या जागी जागोजागी मुरूम टाकण्यात आला हे काम मार्च महिन्यात करण्यात आले होते. त्यानंतर गुत्तेदाराने काम पूर्णपणे बंद केले.
मुरूम टाकल्यामुळे जागोजागी चिखल झाला या चिखलामुळे मोटरसायकल स्लीप होऊन अनेक जण पडले व किरकोळ जखमी झाले आहेत. या जीव घेणे घटना केवळ गुत्तेदाराच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे व हयगयी मुळे होत आहेत.
गाडी स्लीप होऊन पडण्याच्या घटनेला केवळ गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग हेच जबाबदार असल्याने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा आणि लोकांना योग्य रस्ता बनवून द्यावा अन्यथा गुत्तेदार व सर्व बांधकाम उपविभाग माहूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.वानोळा ते पाचोंदा हा रस्ता विदर्भात जाण्यासाठी आणि माहूर किनवट तालुक्याच्या ठिकाणी ये- जाण्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर होतो आहे.
मार्चमध्ये चांगला रस्ता टकाटक असलेला रस्ता उखडून टाकला जो रस्ता काही एक-दोन वर्षांपूर्वीच बनविण्यात आला होता मात्र या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याच्या नावाखाली या रस्त्यावर काम करण्यात आले.
हा रस्ता जेसीबी ने पूर्णपणे उखडून टाकण्यात आला व त्यावर मुरूम टाकण्यात आले त्यानंतर रस्त्याचे काम पूर्णपणे बंद करण्यात आले आणि हा रस्ता अर्धवट स्वरूपात असल्याने व मुरूम टाकलेला असल्याने झालेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. लोकांना प्रवास करीत असताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे या चिखलामुळे अनेक दोन चाकी वाहन स्लिप होऊन रस्त्यावर पडले आहेत अनेक जण जखमी झाले आहेत हा रस्ता लोकांच्या सोयीसाठी करण्यात येतो की लोकांना त्रास देण्यासाठी असा प्रश्न जनतेला पडला आहे शासनाने या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च करून जनतेला सुरक्षित व चांगला रस्ता मिळावा या उद्देशाने लाखो रुपये रस्त्यासाठी खर्च करण्यात येत आहेत मात्र गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग माहूर यांच्या केवळ दुर्लक्षामुळे आणि हयगयी मुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मात्र नागरिकांनी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा गु्तेदारावर आणि सार्वजनिक बांधकाम उप विभागावर गुन्हे दाखल करा अशी मागणी जनतेतून होत आहे तेव्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन होणाऱ्या जीवघेण्या घटना टाळण्यासाठी उपाय योजना करावे अशी अपेक्षा प्रचंड जनतेतून करण्यात येत आहेत…!