*विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे यांनी व्हिडिओ लिंकद्वारे पत्रकार परिषदेला संबोधित केले*

52


 मुंबई प्रतिनिधी :- श्री .  शुलभ गोएल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे २७.८.२०२० रोजी व्हिडिओ लिंकद्वारे पत्रकार परिषदेला संबोधित केले. श्री गोएल यांनी, मुंबई विभागातील लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यान केलेल्या इतर महत्त्वपूर्ण कामांव्यतिरिक्त महत्त्वाच्या कामांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. कॉन्फरन्समध्ये व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील सुमारे ४५ माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी सुतार यांनी यावेळी प्रश्नोत्तर सत्राचे संचालन केले.

श्री पीयूष कक्कड, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (उपनगरीय), श्री आशुतोष गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (इन्फ्रा), डॉ. सुमंत देउळकर, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) आणि मुंबई विभागाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. मुख्यालय आणि मुंबई विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारीही व्हिडिओ लिंकद्वारे परिषदेत सहभागी झाले होते.