*काँग्रेस हाच सर्व घटकांना न्याय देणारा पक्ष*
**खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे प्रतिपादन*
**चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता मेळावा*
**शेकडो युवक, महिलांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश*

**खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे प्रतिपादन*
**चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता मेळावा*
**शेकडो युवक, महिलांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश*
सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
चंद्रपूर : देशात मागील सात वर्षांत महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. शेतकरी, कामगार, युवक असे सर्वच घटकांवर अन्याय होत आहे. मात्र, देशातील भाजप सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. समाजातील गोरगरीब, शेतकरी, युवक हेच काँग्रेस पक्षाच्या मुख्य अजेंड्यावर आहेत. त्यामुळे काँग्रेस हाच सर्व घटकांना न्याय देणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील अष्टभुजा प्रभागात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खासदार बाळूभाऊ धानोरकर बोलत होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमाला झोन सभापती अमजद अली, नगरसेविका संगीता भोयर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, पप्पू सिद्दीकी, राज यादव उपस्थित होते.
पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शहर जिल्हा काँग्रेसचे सचिव मोनू रामटेके यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्यांचे पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये नरेश कस्तुरे, विनोद मेश्राम, पवन बावणे, संजू महामाकिया, आकाश जागीरदार, गोलू चामेवार, धनराज अस्वले, यश उमरे, अमर मेश्राम, अजय खोब्रागडे, रवी सिंधपुरे, राजा शिंगाडे, प्रवीण खापर्डे, स्वप्नील काटकर, जयकुमार तेलसे, सचिन मानकर, प्रवीण नांदेकर, जीवन सागर, राजू सागर, सूरज सैष्टी, महेश कोरवण, सोनू, नरेंद्र केवट, शुभम शेंडे, पुरुषोत्तम शैल्लारे, यशवंत सिंधपुरे, सागर तांडेकर, मिलिंद सैष्टी, राकेश काटकर, वैरागडेताई, मीना जामगडे, साक्षी वैरागडे, लबिता कातकर, छाया कातकर, कनिका मंडल, प्रेमीला चन्नुरवार, निर्मला सिडाम, ममता पाल, दीप्ती सोनकर, प्रीती शैल्लारे, पुष्पा झोलमवार, प्रिया तेलसे, करुणा तेलसे, अनिता दुरबुडे यांचा समावेश आहे.