दबंग भावांच्या दबंग बायकांकडूंन जबरदस्ती ने कुलूप तोडून घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न* *घटने प्रसंगी पोलीस उपस्थित, पीड़ित करत होता विनवणी*

*दबंग भावांच्या दबंग बायकांकडूंन जबरदस्ती ने कुलूप तोडून घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न*

*घटने प्रसंगी पोलीस उपस्थित, पीड़ित करत होता विनवणी*

दबंग भावांच्या दबंग बायकांकडूंन जबरदस्ती ने कुलूप तोडून घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न* *घटने प्रसंगी पोलीस उपस्थित, पीड़ित करत होता विनवणी*
दबंग भावांच्या दबंग बायकांकडूंन जबरदस्ती ने कुलूप तोडून घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न*
*घटने प्रसंगी पोलीस उपस्थित, पीड़ित करत होता विनवणी*

✒ राजू (राजेंद्र) झाडे ✒
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी शहरातील रामनगर वस्तीतील रहिवाशी प्रशांत नीमजे च्या घरात त्याचेच सख्खे गुंड प्रवृत्तीचे भाऊ आपल्या मुजोर पत्निंसह प्रशांत निमजे च्या घरात घुसून बळजबरीने दरवाजा चा कुलूप तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला.कुलूप तोडून कब्जा करण्याच्या बेताने आलेले भावंडं आणि त्यांच्या बायकांच्या सुचने वरून उपस्थित पोलीस बघ्याची भूमिका बजावत त्यांना सहकार्य करताना दिसून आले. अश्यात प्रशांत निमजे आणि त्यांच्या पत्नीने त्या दबांगा चा विरोध केला असता उलट त्यांनीच नाहक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.या बाबत ची तक्रार स्थानीक पोलीस निरीक्षण संदीप धोबे ला सांगितली असता त्यांनी त्यांचे काही एक ऐकून घेतले नाही उलट त्यांचे वरच गुन्हा नोंद करून अटक करण्याचा इशारा दिला. असे प्रवीण नीमजे कडून सांगण्यात आले.अश्या संकट समयी सामाजिक चळवळीत हिरीहिरिने सहभाग घेणारे तथा राजकीय नेते खेमचंद गरपल्लीवार यांनी धाऊन आले.त्यांच्या हस्तक्षेपाने जिल्हा अधीक्षकांकडे लिखित स्वरूपात तक्रार नोंदवली.त्या तक्रारीला ध्यानात घेऊन दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिला.
पीडितांच्या आणि खेमचंद गरपलीवर नी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, गोंडपिपरी येथील रहिवाशी प्रवीण निमजे यांचा राम नगर वस्तीत १८०० चौ.फूट क्षेत्रात सहा खोलुळ्यांचे वडिलोपार्जित मकान आहे. जे त्यांचे स्वर्गवासी वडील विठोबाजी नीमजे यांनी दिनांक ८ जानेवारी २०२१ ला त्यांच्या जिवंत पणी प्रशांत च्या नावे (बक्षिशपत्र) करून दिले.आणि चांदा नझुल मोहल्ला बाबुपेठ चंद्रपूर येथील प्लॉट क्रमांक १११/१ मधील १८०४ चौ. फूट जी जागा विक्री करून मिळालेल्या रक्कमेची समान वाटणी प्रवीण,प्रकाश आणि त्यांची मुलगी असे तीन ही भावंडांमध्ये करावी अशी विठोबा नीमजे यांनी आपल्या मृत्यू पूर्व ईच्छा सांगून दाखवली.आणि गोंडपिपरी मधील संपूर्ण घर प्रशांत च्या नावे (बक्षीस पत्र) करून दिले. प्रशांत पश्चात विठोबा नीमजे यांना प्रवीण,प्रकाश आणि एक मुलगी असे चार अपत्य आहेत.अश्यात या दोन भावंडांचे म्हणने आहे की, प्रशांत प्रमाणे आम्हाला पण घराचा हिस्सा मिळाला पाहिजे.जेव्हा की, आई वडिलांच्या वृद्धावस्थेत प्रवीन आणि प्रकाश च्या गैर हाजेरीत प्रशांत व त्याच्या पत्नी ने त्यांची देख भाल केली.त्यांच्या उतार वयात आणि वाईट वेळेस त्यांचा सहारा बनून या दोघांनीच कर्तव्य पार पाडले. संपत्ती वाटणी मध्ये चंद्रपुर ची जमीन सोडून विठोबा नीमजे यांनी सम्पूर्ण घर मोठा मुलगा प्रशांत च्या नावे करून शेवटचा स्वास घेतला.
अश्यात आता प्रवीण आणि प्रकाश ला घराचा समान हिस्सा पाहिजे या साठी आपल्या बायकांसह प्रशांत च्या घरी येऊन त्यांना धाक दाखवून घरात घुसण्याचा डाव चालवला आहे. यामध्ये पोलिस सुद्धा त्यांची पाठराखण करताना दिसून येत आहे. समाजात शांति, सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलीस प्रशासनाचे परम कर्तव्य आहे.पोलीस ठाण्यात अगर कोणी तक्रार दाखल करण्यासाठी आला त्या वेळेस तक्रार दाराची व्यथा समझुन घेऊन रीतसर तक्रार नोंदवून घ्यावी आणि उपरोक्त प्रकरणाचा तपास करून तक्रारदारांना न्याय मिळवून द्यावा. हेच खऱ्या अर्थाने एक करतव्यदक्ष आणि इमानदार पोलीस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे.परंतु काही बेईमान आणि निष्क्रिय पोलीस कर्मचाऱ्यांमुळे चांगली भावना,चांगले कार्य करणाऱ्या पोलिसांना बदनाम व्हावे लागत आहे
अधिक माहिती नुसार दिनांक १५ ऑगस्ट रोज रविवार ला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास प्रवीण,प्रकाश आणि कामिनी,रानी या आपल्या बायकांसह चार जण प्रशांत च्या घरी येऊन ठेपले.त्या वेळेस काही पोलीस कर्मचारी सुद्धा त्यांच्या सोबत घेऊन आले. घरी येऊन प्रशांत व त्याच्या पत्नी ला धमकावत बोलू लागले की,या घरावर आमचा सुद्धा अधिकार आहे.घरात घुसण्यासाठी मज्जाव करणारे तुम्ही कोण,अगर थांबविण्याचा प्रयत्न केल्यास परिणाम खूप वाईट होणार वेळ प्रसंगी तुम्हाला जिवेनिशी मारून टाकायला मागे हटणार नाही म्हणत दरवाजा चा कुलूप तोडून घरात शिरले.आणि वाटेल तसे बोलून शिवीगाळ केली आणि दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी त्यांचा विरोध केला पण चोघांसमोर दोघांचे काहीही चालु शकले नाही.प्रशांत चे कुटुंब या मुळे खूप भीतीच्या सावटाखाली आहे. मौक्का ठिकाणी पोलीस उपस्थित होते परंतु ते सुद्धा त्यांच्याशी मिळुन असल्याने खामोष पुतल्यांप्रमाने मूग गिळून उभे तमाष्या बघत होते.या संपूर्ण प्रकरणाची माहिती पीड़ित कुटुंब आणि खेमचंद गरपलिवर नी थेट जिल्हा अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीला गांभीर्याने घेऊन दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले.समोरील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी मूल मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.