रेल्वे अधिकऱ्याला दोन लाख रुपयाची लाच घेताना अटक CBI च्या अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले

रेल्वे अधिकऱ्याला दोन लाख रुपयाची लाच घेताना अटक

CBI च्या अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले

रेल्वे अधिकऱ्याला दोन लाख रुपयाची लाच घेताना अटक CBI च्या अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले
रेल्वे अधिकऱ्याला दोन लाख रुपयाची लाच घेताना अटक
CBI च्या अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

खलील वृत्त असे आहे
: चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच CBI च्या अँटी करप्शन विभागाने दोन लाख रुपयाची लाच घेताना रेल्वे वेल्फेअर इंस्पेक्टर अनुप कुमार आवळे यांना रंगेहात पकडले.

सुशी दाबगाव येथील रेल्वे कर्मचारी चरण शेलोटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने एप्रिल 2021 रोजी निधन झाले होते. मृत्यूपश्चात रेल्वे विभागाच्या नियमानुसार विधवा पत्नीला मिळणारा पीएफ, ग्रॅज्युटी व पेन्शनचा लाभ त्वरित मिळवून देण्याकरता रेल्वेचे अधिकारी अनुप कुमार आवळे यांनी दोन लाख रुपयाची लाचेची मागणी केली असता ही रक्कम कुंदाताई सेलोटे यांना देणे शक्य न झाल्याने त्यांनी याबाबतची तक्रार नागपूर येथील सीबीआय अधिकाऱ्यांना केली. अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता नागपुर वरून येणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याला चंद्रपूर मुल मार्गावरील जानाळा फाटा येथे तक्रार करती कुंदाताई यांच्याकडून दोन लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडून जेरबंद केले. CBI अधिकाऱ्यांची कारवाई सुरूच आहे.