एटापल्ली *जांभिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था तालुका एटापल्ली येथील सर्व कर्मचा-यांवर कारवाही करण्यात यावी शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी*

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
(ग्रामीण) मो.नं.९४०५७२०५९३
आज दि. 26/8/21 रोजी तहसीलदार मा.शेवाळे साहेब यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले.
श्री.मनिष दुर्गे तालुका प्रमुख शिवसेना एटापल्ली व श्री.राहुल आदे शहर प्रमुख शिवसेना एटापली व इतर कार्यकर्ते शिवसेनेचे,दिनांक 25/08/2021 रोज बुधवारला दुपारी 1.00 वाजता जांभिया येथे गेले असता तेथील औधोगिक प्रशिक्षण संस्था पुर्णपणे बंद होती तिथे एकही शिक्षकवृंद,कर्मचारी संस्थेचे प्राचार्य कोणीही उपस्थित नव्हते आम्ही गावकरी मंडळी सोबत चर्चा केली असता औधोगिक प्रशिक्षण संस्था महिन्यातुन बोटावर मोजन्यासारखे सुरू असते शिक्षकवृंद मुख्यालयी उपस्थित राहत नाही . जाभिया संस्थेत शिकणा-या विद्यार्थ्यांचे भवित्वव अंधारात असुन शासनाची दिशाभुल करीत आहे.तरी जांभिया संस्थेतील सर्व कर्मचा-यांच्या वेतन कपात करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी शिवसेने कडून मागणी करण्यात आली याप्रसंगी मनिष दुर्गे तालुका प्रमुख,राहुल आदे शहर प्रमुख,राघव सुलवावार युवा नेते,प्रसाद दासरवार,गौरव पेटकर,सुजल वाघमारे उपस्तीत होते.