ब्रेकिंग न्यूज
*कार व बस मध्ये समोरासमोर भीषण अपघात*

*कार व बस मध्ये समोरासमोर भीषण अपघात*
✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
9529811809
चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज सायंकाळी 9.30 च्या सुमारास बायपास रोड बाबूपेठ आंबेडकर चौका समोर भरधाव वेगाने बल्लारपूर कडे जाणारी एम एच २० इ एल -२१८५ बस व बल्लारपूर कडून चंद्रपूर कडे येणाऱ्या एम एच ३४ बि वि १६०३ कार हे आपल्या चुकीच्या दिशेने येत असताना भर धाव असलेल्या कारचा नियंत्रण चुकल्यामुळे बसला जोरदार धडक दिल्याने कार रस्त्याच्या मध्य भागी असलेल्या लाईट च्या खांबाला अडकून दोन वेळा पलटी खात कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्थिर झाली
सुदैवाने कार मध्ये असणाऱ्या पाच मुली व कार चालकाला किरकोड जखमा झाल्या आहेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघात एव्हढा भीषण अपघात होऊन ही जीवित हानी झाली नाही. बस मध्ये सुध्दा चालक आणि प्रवासी असून चालकाने मारहाण होणार याची जाणीव करून बस चे दार बंद करून आतमध्येच घाबरून चालक व प्रवासी अडकले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षकच्या साह्याने करण्यात येणार