*माजी आ.विजयाताई धोटेच्या घरावर हल्ला करणाऱ्या संघटीत गुन्हेगारांना अटक व त्यांच्या संपत्तीची चौकशी करा :क्रांती धोटे*

✒साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 9309747836
यवतमाळ : -अग्रवाल लेआऊट परिसरातील दिवंगत विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या घरावर संघटीत गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांच्या पत्नी माजी आमदार विजयाताई धोटे यांच्याशी असभ्य वर्तुणक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असून या तक्रारीवरून आरोपी बंटी जयस्वाल,सुमीत बाजोरिया अधिक १०० गुंड यांचे विरूद्ध पोलीस स्टेशन शहर येथे भांदवि कलम ३५४ (अ), ४५२, ४४७, १४३, १४७, ४२७, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असुन या गुन्ह्यातील संघटीत गुन्हेगारांच्या मोरक्यांना अटक करून कारवाई करण्याची मागणी क्रांती थोटे यांनी नेताजी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परीषदेत केली.तसेच सुमीत बाजोरीया यांच्या मालमत्तेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.काल झालेल्या घटनेतील शहर ठाणेदार तसेच उपस्थित महसुल अधिकाऱ्यांनी सुद्धा कायद्याचे उल्लंघन केले असून या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ही कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच क्रांती धोटे यांनी भाऊ जांबुवंतराव हे हयात असताना या भुखंडाच्या संदर्भात कोणतीही खरेदी दाखविली नाही मात्र भाऊचे निधन होताच गावगुंडानी डोके वर काढले असुन या गावगुंडाकडुन भुखंड हडपण्याचा डाव असल्याचे क्रांती धोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सत्यनारायण अग्रवाल ले-आऊट परीसरातील काही भुखंड हे बक्षीस पत्र करून दिले असुन त्याचे पुरावे आहेत तरीही बोगस कागदपत्राचा खेळ करून जमीनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न या गुडांकडुन केल्याचेही यावेळी ॲड.क्रांती घोटे यांनी सांगितले तसेच जोपर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत नेताजी मार्केट बंद ठेवुन आंदोलन करू असे सांगितले.