शहादा दोंडाईचा रस्त्यावरील निमगुळ जवळ बस दुचाकीचा भीषण अपघात ओसर्लीचे पती-पत्नी ठार

शहादा प्रतिनिधी- राहुल आगळ
शहादा -दोंडाईचा रस्त्यावरील निमगुळ गावाजवळ भरधाव बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात नंदुरबार तालुक्यातील ओसर्ली येथील पती-पत्नी ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती असे की शहादा दोंडाईचा रस्त्यावर निमगुळ गावाजवळ दोंडाईचा कडे जाताना नंदुरबार तालुक्यातील व ओसर्ली येथील रवींद्र गिरासे वय ६० वर्ष व उज्जैन बाई रवींद्र गिरासे वय ५० वर्षे राहणार ओसर्ली हे दोघी पती-पत्नी एम एच ०५ एल २०६० क्रमांकाच्या दुचाकीने दवाखाना व बाजार करण्यासाठी दोंडाईचा कडे जाताना बस क्रमांक एम एच २० बी एल ४०४५ बस धुळे बडोदा बस व दुचाकीची जोरदार धडक झाली सदर अपघातात दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात तोंडाच्या येथे दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्जुन नरोडे यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस -उपनिरीक्षक सचिन गायकवाड, दिनेश मोरे ,या सहा पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.