*गोंडपिपरीत पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या ; संदिप करपे यांनी केले कुटूंबाचे सात्वन*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी : -गोंडपिपरी शहरात पंधरा वर्षिय मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघळकीस आल्याने खळबळ उडाली आहे.मयंक राकेश मेश्राम असे मृतकाचे नाव आहे.दरम्यान शिवसेनेचा पदाधिकार्यांनी कृटूंबियाची भेट घेत सांत्वन केले.आर्थिक मदत केली.
गोंडपिपरी शहरातील माता वार्ड येथील मयंक राकेश मेश्राम ( वय १५) याने गुरुवारला गळफास लावून जिवन संपविले . ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. मयंकचे वडील वडील सफाई कामगार आहेत.तरूण मुलाचा आत्महत्येमुळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.दरम्यान शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे यांनी मेश्राम कुटुंबियांचे सात्वन केले.पाच हजार रुपयांची मदत पाठवली.शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरज माडुरवार,आनंदराव गोहणे,अशपाक कुरेशी,बब्बू पठाण,रमेश नायडू उपस्थित होते.