रिसोड येथे कृषीदुत व कृषीकन्यांच्या वतीने जनावरांचे लसीकरण शिबिर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 8554920002          

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला संलग्नीत कृषी महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील कृषीदुत व कृषीकन्यांनी ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड *२०२२-२३* या अनुषंगाने दत्तक गाव रिसोड येथे पशुवैद्यकीय दवाखान्यातील वरिष्ठांच्या मदतीने जनावरां साठीची लसीकरण मोहीम राबवली.. रिसोड येथे शेळ्या व मोठ्या प्रमाणात जनावरांच्या लसीकरणाचे शिबिर राबविण्यात आले . त्यात जवळपास २०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. येथील कृषीदुत , कृषीकन्या व पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. प्रारंभी पशुधन विकास अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे व पवन राजूरकर यांनी शेळ्यांमधील आंत्रविषार या रोगासंबंधी व मोठ्या जनावरांमधील फऱ्या व घटसर्प या रोगासंबंधी माहिती, ओळख व प्रतिबंधात्मक उपाय या संदर्भात मार्गदर्शन केले. शेळ्या, मेंढ्या, गायी व म्हशी यामधील वेगवेगळ्या रोगांसंदर्भात सुध्दा मार्गदर्शन केले. शिबिरांतर्गत प्रथम गावातील जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले.

या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालय रिसोड येथिल कृषीकन्या आरती विठ्ठल गाडेकर , मेघा विनायक भांगे , शिवानी प्रकाशराव पवार व कृषीदुत सागर देविदास केसकर, विपुल प्रमोद भगत , गोपाल दिपक सोनवणे , पवन भगवान जाधव , आणि त्याच बरोबर डाॅ. माहुडकर, ज्ञानबाराव देशमुख, शंकरराव देशमुख , यशवंतराव देशमुख, केशवराव देशमुख , अमर ईरतकर , विजयराव देशमुख , गोपालराव देशमुख व तसेच यांच्यासह पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते…. 

तसेच या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ .आशिष आप्तुरकर , मा.आर.एस.डवरे ( विशेष तांत्रीक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड ) , प्रा.डी. डी. मसुडकर ( RAWE कार्यक्रम समन्वयक ) , प्रा.आर. वाय . सरनाईक ( कार्यक्रम अधिकारी ) , तसेच विषय विशेषतज्ञ प्रा. कृष्णा देशमुख यांचे व कृषी महाविद्यालय , रिसोड येथील इतर प्राचार्य वर्गांचे सुध्दा मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here