बिरवाडी फाटा ते खैरेखुर्द रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, शासनाकडून दुर्लक्ष 

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

रोहा: तालुक्यातील चणेरा ते खैरेखुर्द च्या रस्त्यात मोठ मोठे खड्डे झाले आसता संबंधित बांधकाम विभागाकडून चणेरे ते बिरवाडी पर्यंत खड्डे मे महिन्यात भरण्यात आले होते, परंतु बिरवाडी फाटा ते खैरेखुर्द रस्त्यावरील खड्डे भरण्यास शासनाकडून दुर्लक्ष करीत आसलेने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आसे या रस्त्यावरुन खैरेखुर्द तळवडे पांगळोली व दोन आदिवासी वाड्यांचा दर रोज चा चणेरा बाजार ( मार्केट ) शाळा रुग्णालय बँका तलाठी कार्यालय व अन्य विभागाकडे जाण्या चा एकमेव रस्ता आसुन गणेश उत्सव ही येत आसलेने येथील नागरिकांची गैरसोय होत आसलेने स्थानिक आमदार खासदार व प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच खैरेखुर्द चे मुस्लिम समाज अध्यक्ष श्री.आजीम अ.कादीर धनसे व समाज सेवक श्री. शहानवाज युनुस मुकादम यांनी कोनतीही आपेक्षा न करता व शासनाची वाट न पाहता मजुरकर व पिकप टेम्पो च्या द्वारे सदर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम केले.

मिडीया वार्ता न्युज च्या पाठपुढाव्याणे ग्रामपंचायत खैरेखुर्द करुन मजुरकर व इंधन खर्च कामी मदत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे यांनी दिले व सदर चा रस्ता डांबरीकरण मंजूर होणे बाबत ग्रामपंचायत करुन मागणी करण्यात येईल, तसेच रस्त्याचे खड्डे भरणे कामी पुढाकार घेतलेने मुस्लिम समाज अध्यक्ष व मिडीया वार्ता न्यूज चे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here