४९ वी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी नागभिड येथे संपन्न

69

४९ वी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी नागभिड येथे संपन्न

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

9403321731

नागभिड —-महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान संस्था रविनगर नागपूर यांचे निर्देशानुसार दिनांक २३/८/२०२२ ला ४९ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभिड येथे करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मा.वर्षाताई गौरकर अतिरिक्त मुख्य कर्यकारी अधिकारी जी. प. चंद्रपूर मा. प्रणालीताई खोचरे गटविकास अधिकारी पं.स. नागभिड यांचे अध्यक्षतेखाली, मा. अमीर धम्मानी प्राचार्य ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, मा.अजय काबरा सचिव समिधा शिक्षण तसेच श्रीमती संगीताताई नारनवरे मुख्याध्यापिका ट्विंकल इंग्लिश स्कूल यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

प्रमुख पाहुण्याचे स्वागत, स्वागत गीताने ट्विंकल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यानी केले तसेच पुषपगुच्छ देऊन करण्यात आले. प्रास्ताविक अरविंद चीलबुले गट शिक्षण अधिकारी तर प्रमुख पाहुणे अमीर धम्मानी ,अजय काबरा तसेच उद्घाटक मा. वर्षाताई गौरकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. मा. प्रणालिताई खोचरे गटविकास अधिकारी यांनी अध्यक्षीय भाषण केले. आभार कु. अश्विनी शेंडे यांनी मानले.

सदर प्रदर्षनी मध्ये नागभिड तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापन अश्या ५९ पूर्व माध्य.व माध्य.शाळांनी व दोन शिक्षक यांनी प्रदर्षणी मधे ७० मॉडेल सादर करून सहभाग घेतला.या मॉडेल चे मूल्यमापन प्रा. मोहतुरे प्रा. रुडे प्रा. गोडे रा.म. गा.महा.नागभिड यांनी केले.

आदिवासी विभाग ६ते८ प्रथम – प्रजवल गेडाम , जी. प. उ. प्रा. शाळा येनोली माल द्वितीय – परशुराम बनसोड प्रियद्शिनी विद्या. गंगासागर हेटी ९ ते १२ – रिया सोनटक्के मीनाताई विद्या. नवखला , द्वितीय – आदिल आंबोरकर लोक विद्या. सावरगाव. बिगर आदिवासी विभाग ६ ते ८ प्रथम – अंजली प्रधान जनता विद्या. नागभीड द्वितीय – अथरव सोनवणे विश्र्वज्योत्ती काँ. तलोधी बा. तर ९ ते १२ या गटात – प्रथम आर्यन सातपैसे जनता विद्या.नागभिड व्दितीय- शतनू सहारे विश्व ज्योती कॉ. तलोधी बा. यांची निवड करण्यात आली.बक्षीस वितरण शुभांगी पोहेकर प्राचार्य यांचे अध्यक्षतेखाली व भारत मेश्राम अध्यक्ष तालुका मुख्याधापक संघ,प्रा, राऊत प्रा,गेडाम मुख्या.यांचे उपस्थिती संपन्न झाला. निवड झालेल्या र्विद्या्र्थ्याना शिल्ड देऊन गौरव करण्यात आला. तसेच मॉडेल सादर केलेल्या शिक्षकांचा सुद्धा गौरव करण्यात आला.

विज्ञान प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता ट्विंकल इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक मुख्याध्यापक व प्राचार्य विध्यार्थी यांनी परिश्रम घेऊन उत्तमरित्या पार पाडली.यासाठी संस्थेचे अध्यक्ष गणेशराव तर्वेकर व सचिव अजयभाऊ काबरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्रदर्शनीचे यशस्वीेतेकरिता तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक ,केंन्द्र प्रमुख ,साधनव्यक्ती व विध्यार्थी यांनी यशस्वीेतेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल गटशिक्षण अधिकारी यांनी सर्वाचे आभार मानले.विज्ञान प्रदर्शनी तालुक्यातील सर्व विद्यार्थी वर्ग शिक्षक पालक, यांची उपस्थिती होती.