मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंक करा, प्रशासनाचा आदेश

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 8554920002

वाशिम, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंकींग करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मतदार याद्यांच्या प्रमाणीकरणासाठी मतदारांची दुबार नावे वगळण्यासाठी, आधारकार्ड माहितीला दुहेरी सुरक्षितता इत्यादी करीता मतदारांच्या मतदार ओळखपत्रासोबत त्यांचे आधार लिंक करणे आवश्यक आहे.

मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंकींग करण्याकरीता मतदारांनी निवडणूक शाखा, तहसिल कार्यालय, किंवा आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. आधार लिंकीग संबंधित अर्ज क्रमांक ६ भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येते किंवा मतदार स्वत: Voter Help Line अॅपव्दारे आपल्या मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंकींग करु शकतात.

त्यामुळे वाशिम विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार नागरीकांनी आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आपले व कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंकींग तातडीने करावे. असे आवाहन वाशिमचे तहसिलदार विजय साळवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here