जिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची हेळसांड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा

51

जिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची हेळसांड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 8554920002

वाशिम – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी मोठी कसरत करावी लागते. विविध कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्यांची मोठी हेळसांड होते. दिव्यांगांवर होणारा हा अन्याय दुर करुन त्यांना सुरळीतपणे दिव्यांग प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दिव्यांगांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

 

निवेदनात नमूद आहे की, जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्राच्या पुर्ततेसाठी दर बुधवारी दिव्यांगांची तपासणी करण्यात येते. मात्र रुग्णालयात नियुक्त अस्थिरोग तज्ञाच्या अरेरावीमुळे अनेक अस्थिव्यंग लाभार्थीना तपासणीकरीता तारीख दिली जाते. तसेच त्यांना दिव्यांग असल्याबाबतचे विविध पुरावे मागुन त्रस्त केल्या जाते. याबाबत अनेक दिव्यांगांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केल्या आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून दिव्यांगांच्या होणाऱ्या या अन्यायाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे दिव्यांगावर होत असलेला हा अन्याय दुर करुन त्यांची दर बुधवारी नियमित तपासणी करण्यात यावी व दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, महिला सेना जिल्हाध्यक्षा सीता धंदरे, शहराध्यक्षा वंदना अक्कर, तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, शेतकरी सेनेचे रिसोड तालुकाध्यक्ष वैभव वानखेडे, तालुका सचिव धनीराम बाजड, मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन कुटे, महाराष्ट्र सैनिक अनिल भगत, गोपाळ खरात, राजाराम चव्हाण, अंकुश चव्हाण, सचिन तुरेराव, ध्रुपडा पवार, विशाल गरकळ, पवन डुबे, बनारस केळे, मदन चव्हाण, ज्ञानेश्वर गवई, गोपाल मोटे, परशराम दंडे, दिलीप सातव, रमेश चव्हाण, धनीराम बाजड, संतोष आंबेकर, राजाराम राऊत, योगीराज लाडवीकर, विठ्ठल गादेकर, वंदना अक्कर, यमुना बेलखेडे, वर्षा गावंडे, विना लुटे, शमिनाबी लुकमानशाह, आशा रत्नपारखी, नरसिंग राठोड, प्रेमदास राठोड, गोपाल रत्नपारखी, गजानन झामरे, प्रकाश पडघान, मनोहर चव्हाण, जगन मुतळे, संगीता कुराळे, प्रविण सपाटे, दत्ता मापारी, संजय आंबलकर, तारासिंग राठोड, पांडूरंग राऊत, सुरेश बोडखे, प्रतिक कांबळे, प्रमोद राठोड, विकी वर्मा, विनोद वानखेडे, रामभाऊ वाघ, नितेश राठोड, महेश देशपांडे, वनिता पांडे, रवि साबळे, आतिष डहाळे, सय्यद रशीद, शेख रिजवान, मैन्नुदीन काजी, पंजाब अंभोरे आदी उपस्थित होते.