आसोला मेंढाच्या नहरात बुडणा-या पाच पैकी चार बालकांना वाचविण्यात सावली येथील तरुणांना यश, एक मुलीचा दुर्दैवी मृत्यू, सावली येथील बालु भंडारे व विशाल दुधे चे साहसी कृत्य

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधी

मो: 7263907273

सावली शहरातून गेलेल्या आसोला मेंढा नहरात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आपल्या आई सोबत दोन बालके गेली होती.तर त्याच नातेकुटुंबातील तीन भाऊ बहीण सुध्दा नहरात गेली, बालके नहरात आंघोड करीत होते. खोल पाण्यात गेल्याने ही बालके बुडू लागली.या बालकांना वाचविण्यासाठी एका मुलीने उडी घेतली आरडा ओरड केल्यानंतर जवळच्या गोदामातील मजुर बालु भंडारे,व नहरा जवळील रहिवासी विशाल दुधे या युवकांनी जिगरबाज पणा दाखवत साहसाने .चार बालकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.मात्र जि वाचविण्यासाठी गेलेली मुलीला जलसमाधी मिळाली होती ,अखेर 24 तासांनी (दि 27) ला सिंगापूर समोर अर्धा किमी वर नहरात तरंगताना तिचा मृत्यु देह दिसला.

 सावली शहराला लागून आसोला मेंढा तलावाचे नहर गेले आहे.या नहरात कपडे धूवायला गेलेल्या आई सोबत बालके गेली होती.आई कपडे धूत असतांना ही बालके नहरात आंघोळ करायला उतरलीत.मात्र खोल पाण्यात गेल्याने रोहीत अनिल मेडपल्लीवार ( वर्ग 7 ),अमित अनिल मेडपल्लीवार ( वर्ग 5 ),राहूल अंकुश मक्केवार ( वर्ग 4 ),सुश्मिता अंकुश मक्केवार ( वर्ग 8 ) ही मुले बुडू लागली.या मुलांना वाचविण्यासाठी पाचव्या वर्गात शिकणारी काजल अंकूश मक्केवार आपल्या भावा बहीणीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.

हा प्रकार लक्षात येताच आरडाओरड झाली.आजूबाजूला असलेले नागरिक धावत आले.बुडणार्या चार मुलांना बाहेर काढण्यात यश आले.मात्र काजल मक्केवार ही वाहून गेली.घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली.पोलीस विभागाने विलंब न करता तहसील प्रशासनाकडून बोट उपलब्ध करून दिली व वन्यजीव प्रेमी विवेक लेनगुरे व टिम यांनीबोट च्या साह्याने काजलचा शोध घेत होते घटनास्थळा पासुन ते नांदगाव पर्यंत नहरातुन शोध सुरू होता ,अखेर सिंगापूर जवळ अर्धा किमी अंतरावर नहरात तिचा मृत्यु देह तरंगत दिसला .

 

काजल हि ईयत्ता 5 वी त आश्रय शाळा चांदाळा येथे शिकत होती ,पोळा सणानिमित्त ती आई वडील कडे आली होती , भाऊ दोन,बहीण व दोन मेहुणे असे पाच जण नहरावर गेली ,आपल्या भावाला वाचविण्यासाठी तीने उडी मारली , शेवटी तीच गेली,पण ज्या जिबरबाज युवकांनी चार बालकांचे प्राण वाचविले त्यांच्या साहसी वृत्तीचे अभिनदन केले जात असताना ,काजलच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here