शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णु पाटील व पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळी फित दाखवून निषेध व्यक्त...

शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णु पाटील व पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळी फित दाखवून निषेध व्यक्त…

शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णु पाटील व पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळी फित दाखवून निषेध व्यक्त...

अलिबाग तालुका प्रतिनिधी
-रत्नाकर पाटील
९४२०३२५९९३
अलिबाग : काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे. असे असताना भाजपा-शिंदे सरकारला दुरावस्था झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आताच वेळ मिळाला का…? अजूनपर्यंत झोपून राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महामार्ग पाहणीच्या नौटंकीचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे आणि संपर्कप्रमुख आंदोलन सम्राट विष्णुभाई पाटील यांनी निषेध आंदोलन केले.  सोमवार दि.२६ ऑगस्ट रोजी महामार्गावरील पेण वाशी येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळ्या फिती दाखवण्यात आल्या. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोयनाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यावेळी संपर्क प्रमुख विष्णु पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना वक्ते धनंजय गुरव, विभाग प्रमुख गिरीश शेळके, चंद्रहार पाटील व जिल्हा महिला संघटिका दिपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, जिल्हा समनवयक नरेश गावंड, पेण तालुका प्रमुख जगदिश ठाकूर, अलिबाग-पेण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपतीला चाकरमानी पंधरा दिवस आधीच कोकणात पोहचतात. काही चाकरमानी दुरावस्था झालेल्या महामार्गावरून कोकणात गेलेही. पावसाळा सुरु झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. तेव्हा आधीपासून मुख्यमंत्र्यांनी महामार्गाची पहाणी का केली नाही…? आता रस्त्याची पाहणी करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कामावरून महायुतीत वाजले आहे…रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आल्याने मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी रस्त्यावर आल्याचा टोला उबाठा शिवसेनेने हाणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here