Maharashtra chief minister ladki bahin yojana information
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमधील अर्ज मंजूर करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच या अर्जदार महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.

मनोज कांबळे, नागपूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here