माहेगाव देशमुख शिव रस्ता, धारणगाव वन विभागातून अवैद्य वाळू वाहतुकीला जोर.
महसूल वनविभाग व पोलीस प्रशासन मात्र शांत!
दैनिक मीडिया वार्ता.
सुनील भालेराव.
.अहिल्यानगर.
9370127037
अहिल्यानगर जिल्ह्यातील
कोपरगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेले माहॆगाव देशमुख व धारणगाव येथे गोदावरी नदी पात्राचे पाणी कमी होतात काही वाळू चोरांनी चक्क फरांडीच्या साह्याने पुन्हा आपला मोर्चा माहॆ गाव देशमुख व धारणगाव येथे वळवला आहे यासंदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रारी दाखल करत वरिष्ठ पातळीवरती तक्रारी दाखल केल्या आहेत यावर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की कारवाई साठी गुप्तपथके पाठवून गुप्त खबरद्वारे एम पी डी प्रमाणे कारवाईसाठी आदेश देण्यात आलेली आहे असे देखील माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या शिष्टमंडळाला आज सांगितले असून यात कर्तव्यत कसूर करणारे अधिकारी यांची देखील गय केली जाणार नाही असे देखील जिल्हाधिकारी, डॉ. पंकज आशिया यांनी आज आमच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे असून जबाबदार अधिकारी यांना देखील धारेवर धरण्यासाठी कठोर पावले उचलू असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले, त्याचप्रमाणे या वाळू तस्करांवर आपण पुराव्यानिशी आम्हाला व्हिडिओ तसेच पुरावे द्यावे आम्ही mpd प्रमाणे कारवाई करण्यास आदेश पारित करू व केलेले देखील आहे यामुळे आज बऱ्याच महसूल व अधिकाऱ्यांमध्ये वेगळे चर्चेला उधाण आलेले आहे, त्याचप्रमाणे उद्यापासून आमची शिष्ट मंडळ तालुका ठीक ठिकाणी गुप्त खबरेमार्फत पुराव्यानिशी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांना मसुदा तयार करून पाठवण्यात येणार आहे,या वाळू तस्करांमुळे तालुक्यामध्ये कायद्याचे भय अजिबात राहिले नाही, कायदा सुव्यवस्था निर्माण झाला आहे, चोऱ्या दरोडे हाणामाऱ्या दादागिरी लहान मुलींची छेड अशा अनेक प्रकारचे प्रकरण देखील वाढले आहे, यामुळे आता कोणीही पावले उचलायला तयार नसताना स्वतः आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना पावले उचलल्यास सांगितले असून जिल्हाधिकारी यांनी देखील यास हिरवा कंदील दाखवला आहे, तरीदेखील गुप्त खबऱ्यानुसार माहिती समोर येत आहे की माहेगाव देशमुख धारणगाव येथे काही दबंग तस्करांच्या मार्फत वाळू तस्करी ला आजपासून नव्याने जोमाने सुरुवात झाली आहे, कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी जणू काही पाठच फिरवली आहे, माननीय प्रांत साहेब हे देखील सध्या शांत दिसत आहे,याचा आढावा उद्या आमचे शिष्ट मंडळ पुराव्यानिशी मसुदा घेऊन वरिष्ठ पातळीवरती तक्रारी दाखल करून पुन्हा तालुक्यामध्ये चाललेला अवैध व्यवसाय उघड करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंगेश औताडे यांनी दिला!