*वर्धा जिल्हात मिळत आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण*
*वर्धा: मुकेश चौधरी:-*
आज वर्धा जिल्हात कोरोना वायरसची स्थिती गंभीर होताना दिसत आहे. शुक्रवारला ५४३ व्यक्तींचे कोरोना वायरस चाचणी अहवाल वर्धा आरोग्य विभागाल प्राप्त झाले. त्यापैकी ११८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे आहे. तर आज चार कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आणी दुसरीकडे शुक्रवारी ६५ व्यक्तींनी करोना वायरस ला हरविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील ४१ पुरुष तर ३० महिला, देवळी तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, सेलू तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, आर्वी तालुक्यातील चार पुरुष तर एक महिला, कारंजा तालुक्यातील दोन पुरुष तर तीन महिला, हिंगणघाट तालुक्यातील १७ पुरुष तर चार महिला आणि समुद्रपूर तालुक्यातील दोन पुरुषांचा समावेश आहे. तसेच मृतकांमध्ये सेलू येथील ६९ वर्षीय पुरुष, वर्धा येथील ६० आणि ८० वर्षीय पुरुष आणि हिंगणघाट येथील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रवारी ५३४ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यावर त्यापैकी ११८ व्यक्तींना कोरोनाच संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर सध्या ३७ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला आहे.
शुक्रवारी ५३४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते करोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच या व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे.