ऐनवेळी रद्द झालेल्या परीक्षेबाबत सरकारनी खुलासा द्यावा
सोबतच विद्यार्थांच्या वेळेच्या आणि भविष्याशी खेळ खेळणा-या संबंधित एजन्सीवर कारवाई करावी
परीक्षेसंबंधी तयारी केलेल्या विद्यार्थांचे भवितव्य काय असा प्रश्न करत भाजयुमो जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी विचारला सरकारला जाब
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की परिक्षेसबंधी विद्यार्थीचे भवितव्य काय करायचे
ऐनवेळी रद्द झालेल्या परीक्षेबाबत सरकारनी खुलासा देऊन,विद्यार्थांच्या वेळेच्या आणि भविष्याशी खेळ खेळणा-या संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी
भाजयुमो जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केली आहे.या बाबतचे पञ
राज्याचे आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्याकडे
पाठविण्यात आले.
सदर पञातून महेश कोलावार यांनी म्हणाले की,दि.२५ आणि २६ सप्टेंबरला आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील सुमारे ६२०० पदांसाठी राज्यात परीक्षा घेतली जात होती.यासाठी तब्बल ८ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले असून राज्यातील १५०० केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार होती.तर ऐनवेळी परीक्षा कालावधीच्या एका दिवसा अगोदरील काही तासांपूर्वी परीक्षा रद्द झाल्याची सूचना आरोग्य विभागानी संदेश माध्यमाद्वारे विद्यार्थांना दिली.सदर सूचना बघून अनेक विद्यार्थांना धक्काच बसला.कारण सर्व विद्यार्थी कित्येक महिन्यांपासून दिवस-राञ तास न तास परीक्षेची पूर्वतयारी करुन उद्याच्या दिवसाची वाट पाहत होते.यातले बहुतांश विद्यार्थी उद्या आपली परीक्षा आहे या तयारीने शासनानी दर्शविलेल्या परीक्षा केंद्राच्या शहरी मुक्कामालाही गेले.आणि अश्यातच शासनाचा परीक्षा रद्द झाल्याची सूचना विद्यार्थांना प्राप्त झाले असता सूचना बघून अनेक विद्यार्थी संभ्रमात पडले की,आता काय करायचं.आधीच आर्थिकदृष्ट्या बेरोजगारीने ञस्त असलेल्या अनेक विद्यार्थांना ऐनवेळी मानसिक व आर्थिक फटका बसला.सदर प्रकार परीक्षेसंबंधित भर्तीचे कंञाट दिलेल्या खासगी एजन्सीच्या निष्क्रियतेमुळेच घडला असावा अशी शंका वाटते.तर शासनानी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन संबंधित एजन्सीवर कारवाई करावी,अशी मागणी महेश कोलावार यांनी केली.