नागेशवाडी निंगणुर येथे अवैद्य चालत असलेल्या गावठी दारूवर बिटरगाव पोलिसांची धाड

51

प्रतिनिधी यवतमाळ साहिल महाजन

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक प्रताप भोस व पोलिस उपनिरीक्षक म्हणून कपिल मस्के नियुक्त होताच त्यांच्या अवैध धंदेवाल्यांवरील धडक कारवाईने बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध धंद्यावाल्यांविरोधात कारवाई होत नसल्याने अवैध धंद्याचा या परिसरात सुळसुळाट झाला होता. त्यातच नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रताप भोस रुजू होताच अवैध धंद्यावाल्यांविरोधात कारवाई सुरू केली असून यामध्ये दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांच्या नेतृत्वात निगनुर पासून तीन किलोमीटरवर असलेल्या नागेशवाडी येथे अवैध हात भट्टीवर धाड टाकून15 लिटर गावठी दारू व 20 किलो मोहचा सडका माल पोलिस यांनी नष्ट केला, हि कारवाई निंगणुर बीट जमदार गजानन खरात, सहाय्यक बीट जमादार दत्ता कुसराम ,यानी केली असल्याची माहिती आज दि 27 सप्टेंबर रोजी पोलिसांकडून देण्यात आली आहे, सदर आरोपी जवळून मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. तसेच नागेशवाडी येथे दारू बाबत अनेक कारवाया करून गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती सरपंच, पोलिस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून गावात कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय चालणार नाही अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.