आज गुगल झाले तेवीस वर्षाचे...हॅपी बर्थडे गुगल

२३ वर्षांपूर्वी २७ सप्टेंबर १९९८ साली अमेरिकेत गुगलची स्थापना झाली होती. आज तुम्ही जगभर कुठे असाल, कुठलीही भाषा बोलत असाल गुगल डिजिटल गुरु म्हणून सदैव तुमच्यासोबत असत. या गुगल कंपनीबद्दलच्या काही कमाल गोष्टी वाचूया.

how google started
आज गुगल झाले तेवीस वर्षाचे…हॅपी बर्थडे गुगल

सिद्धांत

मुंबई दि. २७ सप्टेंबर २०२१:

१९९७ साली अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकणाऱ्या सेर्गे ब्रिन या विद्यार्थ्याला युनिव्हर्सिटीमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या लैरी पेज याला युनिव्हर्सिटीची सैर घडवून आणण्याची जबाबदारी दिली गेली होती. पुढच्या दोन वर्षात त्यांची मैत्री होऊन आपल्या हॉस्टेल रूममध्येच त्यांनी गुगलच्या स्थापनेची सुरुवात केली.

सप्टेंबर २७, १९९८ साली त्यांनी गूगल कंपनी रजिस्टर केली. गुगलचा पहिला सर्वर एका लहान मुलांच्या खेळण्याच्या ब्लॉक पासून बनलेल्या कॅबिनेट मध्ये ठेवला होता. आज गुगलचे जगभरात २० डेटा सेंटर्स असून त्याद्वारे जगभरातल्या १५० हुन जास्त भाषांमधील अब्जावधी सर्च केले जातात.

गुगलचा पहिला सर्वर

 

पहिल्यांदा संस्थापकांकडून गूगलचे नाव बॅकरब असे ठेवण्यात आले होते. पुढे ते बदलून ते गुगल ठेवण्यात आले. या गुगलच्या नावाबद्दलही अनेक कथा प्रचलित आहेत. खरतर संस्थापकांना कंपनीला गणितीय संज्ञा ” गुगोल” हे नाव ठेवायचे होते, परंतु एका महत्त्वाच्या डॉक्यूमेंटवर स्पेल्लिंग मिस्टेक झाली आणि गुगोल च्या ऐवजी गुगल असे लिहिण्यात आले तेच नाव पुढे कायम झाले.

सेर्गे ब्रिन आणि लैरी पेज यांनी २००२ मध्ये गुगल विकण्याचा विचार केला होता. याहू ने त्यांना ३ बिलियन डॉलर्सची ऑफर दिली होती. परंतु संस्थापकांनी ती नाकारली. आज गुगलची एकूण संपत्ती ८५८ बिलियन डॉलर्स इतकी आहे. दुसरी चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे २०१० पासून प्रत्येक आठवड्याला एक नवीन कंपनी गुगलने विकत घेतली आहे.

२००६ मध्ये गुगलने युट्यूब १.६५ बिलियन डॉलर्सला विकत घेतले होते.

गुगलचे कॅलिफोर्निया येथील “गुगलप्लेक्स” नावाचे मुख्यालय जवळपास २ लाख स्क्वे.फीट इतक्या भव्य आकारावर बांधलेले आहे. इथे काम करणाऱ्या लोकांना ‘गुगलर’ असे म्हटले जाते. गंमतीची बाब म्हणजे मुख्यालय आणि परिसरातील गवतावर चरण्यासाठी गुगल २०० बकऱ्यांचा वापर करते.

गुगल मुख्यालयातील गवतावर चरणाऱ्या बकऱ्या

१६ ऑगस्ट २०१३ रोजी गुगल ५ मिनिटासाठी बंद झाले होते. त्यावेळी जगभरातील इंटरनेटचा वापर जवळपास ४०% हुन कमी झाला होता. यावरून गुगलचे लोकांच्या जीवनातील महत्त्व कळून जाते. सध्याच्या घडीला जगभरातले ९०% इंटरनेट युझर्स गुगलचा वापर करतात.

गुगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचई हे मूळचे तमिळनाडू येथील आहेत. अवघ्या ११ वर्षांच्या गुगलमधील नोकरीनंतर , त्यांच्यावर गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबदारी १० ऑगस्ट २०१५ रोजी सोपवण्यात आली होती.

आजच्या घडीला जगभरातून अंदाजे २ लाख लोक गुगलमध्ये काम करतात. त्यापैकी ५००० लोक भारतामधून असून बेंगलोर आणि हैदराबाद येथे गुगलची मुख्यालय आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी अलीकडेच भारतामधील डिजिटल सुधारणेसाठी गुगलकडून ७५,००० करोड गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here