महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या प्रयत्नाने मेहरुण परिसरात ‘एलईडी’ लाईट उभारणी गैरसोय दूर झाल्याने नागरिकांनी दिले महापौरांना धन्यवाद
महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या प्रयत्नाने मेहरुण परिसरात ‘एलईडी’ लाईट उभारणी गैरसोय दूर झाल्याने नागरिकांनी दिले महापौरांना धन्यवाद

महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या प्रयत्नाने
मेहरुण परिसरात ‘एलईडी’ लाईट उभारणी

गैरसोय दूर झाल्याने नागरिकांनी दिले महापौरांना धन्यवाद

जळगांव प्रतिनिधी खंडू महाले मो.7796296480

जळगाव, ता. 27:* शहरातील मेहरुण परिसरात प्रभाग क्र. 15 मध्ये महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवार, दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी ‘एलईडी’ लाईट उभारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासह त्यांच्या सहकारी नगरसेवकांना धन्यवाद दिले आहेत.

पालकमंत्री मा.ना.श्री. गुलाबराव पाटील यांनी ‘डीपीडीसी’मधील नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना 2020-21 अंतर्गत नऊ मीटर 21 नगर साडेबारा मीटर तिचे दोन नगचे हायमास्ट व मिनी हायमास्ट उभारणीसाठी सोळा लाख रुपये मंजूर केले होते. त्यातून या कामाची उभारणी करण्यात आली. यामध्ये भवानी मंदिर, महादेव मंदिरापुढे, मदरसा गल्ली कोपरा मेन रोड, दिलीप भोईंच्या दुकानाजवळ, शहावलिया मस्जिद, पटेल गल्ली, मिलिटरी कॅम्प दत्त मंदिराजवळ, बिलाल चौक मस्जिदसमोर, नमस्कार प्लायवूड, सुतार डीपी, गुलाबबाबा कॉलनी गणपती मंदिर, इच्छादेवी मंदिर, रत्नाकर नर्सरी, सुभाष डीपी, पाण्याचा हौद, के मार्ट, मरिमाता मंदिर, व्यास मेडिकलसमोर, जय भवानी नगर, महादेव मंदिर चारी, मोहमद्दीया नगर आदी ठिकाणी ‘एलईडी’ लाईटची उभारणी करण्यात आली.

यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, नगरसेवक श्री.प्रशांत नाईक, सलमान खाटीक, श्री.अनिल सोनवणे, मक्तेदार सत्यम इलेक्ट्रिकलचे श्री.मयूर चौधरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here