मुंबई: पत्नी माहेरी गेल्याने संतापुन पतीने केली पत्नीची हत्या,

काशीनाथ बारामते✒
        मुंबई प्रतिनिधी
       मो. न.

मुंबई :- मुंबईच्या उपनगर विरार मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुटुंबीक वादातून पतीने आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने विरार हादळले आहे. पतिने धारदार हत्याराने पत्नीच्या शरीरावर वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. विरार पूर्व फुलपाडा गांधी चौकातील नरेंद्र माऊली अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. सुप्रिया गुरव वय 28 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, जगदीश गुरव असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पती हा फरार झाला आहे.

28 वर्षांच्या सुप्रिया गुरवची कौटुंबिक वादातून पतीने धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या केली. विरार पूर्व फुलपाडा परिसरातील नरेंद्र माऊली अपार्टमेंट पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 106 मध्ये ही हत्या करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरातच ही घटना घडली आहे.
आरोपी पती फरार
हत्या झालेल्या महिलेला तीन मुलं असून ती आईकडे राहण्यासाठी अली होती. घरगुती वादातून हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विरार पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पतीच्या शोधासाठी 2 विशेष पथके तयार करून रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here