रस्त्याच्या उंचीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या मरु नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात जमा होवून पिकांची नासाडी

57

रस्त्याच्या उंचीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या मरु नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात जमा होवून पिकांची नासाडी

रस्त्याच्या उंचीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या मरु नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात जमा होवून पिकांची नासाडी
रस्त्याच्या उंचीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या मरु नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात जमा होवून पिकांची नासाडी

.त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

भिवापूर : सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे नवनिर्मीत उमरेड-चिमूर-वरोरा महामार्गाची वाढलेली उंची मालेवाडा येथील सत्तर ते अंशी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. रस्त्याच्या उंचीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या मरु नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात जमा होवून पिकांची नासाडी होते.
पेरलेले वाया जात असल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. यातून मार्ग काढून दिलासा देण्याची तसेच भविष्यात वारंवार निर्माण होण्याची शक्यता असलेल्या रस्त्याच्या उंचीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पिडीत शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन शुक्रवारी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना देण्यात आले.

मंगळवारी (ता.२१) झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेवाड्याजवळून वाहणाऱ्या मरु नदीला पूर आला. पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरले. रस्ता उंच असल्याने पुराचे पाणी ओसरायला कितीतरी तास लागले. नदी व रस्त्याला लागून असलेली शेते पाण्यात बुडून होती. त्यामुळे सोयाबीन, कापूस, मिरची आदी पिके पुरती हातची गेली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

विशेष म्हणजे नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्या संसाराचा गाडा याच शेतीवर चालतो. पेरलेले सर्वच पाण्यात बुडून नष्ट झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. बुधवारला आमदार राजू पारवे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याने पिडीतांना दिलासा मिळाला. मात्र रस्त्याची उंची ही कायमची समस्या ठरणार असल्याने महामार्ग प्राधिकरण, जल संधारण विभाग व गोसे खुर्द प्रकल्पाच्या

अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची मागणी पिडीतांकडून करण्यात आली. विशेष उल्लेखनिय म्हणजे रस्ता बांधकाम सुरू असताना आज निर्माण झालेल्या समस्येबाबतची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. परंतु महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला होता. या समस्येविषयी आज तहसीलदार कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पं.स.चे उपसभापती क्रिष्णा घोडेस्वार, उपसरपंच प्रशांत ईंगोले, नारायणराव ईंगोले, मनोहर वाखेडे, प्रशांत बारेकर आदींसह पिडीत शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री नितीन राऊत, आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी व उपविभागिय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे समजते.