नागपुर: वीज कनेक्शन कट केल म्हणून एका परीवाराचा महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

16

नागपुर: वीज कनेक्शन कट केल म्हणून एका परीवाराचा महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

नागपुर: वीज कनेक्शन कट केल म्हणून एका परीवाराचा महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला.
नागपुर: वीज कनेक्शन कट केल म्हणून एका परीवाराचा महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला.

=== मुख्य मुद्दे ===
●हल्ल्यात महावितरण कर्मचारी ●गंभीर जखमी झाला आहे.
आरोपी परिवारा विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर:- नागपुर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना वायरसच्या महामारी मुळे सर्वसामान्याचे सर्वत्र जिवन अस्तव्यस्त झाल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे विज महावितरण मंडळाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत असल्याचे माघील अनेक घटना वरून समोर येत आहे.

नागपुर मधील एका परिवाराने त्यांच्या घरच वीज कनेक्शन कट केल म्हणून विज महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महावितरण कर्मचारी गंभीर रित्त्या जखमी झाला आहे. त्या जखमी कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नागपूर मधील भेंडे ले आऊट परिसरातील इंद्रप्रस्थ नगरमध्ये राहणा-या परीवाराने वीजबिल थकवल त्याचे वीज कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर जीवघेना हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महावितरणचे तंत्रज्ञ सुखदेव केराम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात सुखदेव प्रचंड रक्तबंबाळ झाले होते.

हल्ला करणाऱ्या परिवारावर 5 हजार 155 रुपयांचे वीजबिल थकीत होते. त्यामुळे ते विज बिल वसुली साठी हे पथक गेले होते त्यांच्याविरोधात विजेचं कनेक्शन कापण्याची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित कारवाईसाठी महावितरणाचं पथक गेलं असताना कुटुंबातील काही सदस्यांनी आधी महावितरणाच्या पथकासोबत शाब्दिक वाद घातला. त्यानंतर त्यांनी थेट केराम यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने प्रहार करत गंभीर जखमी केले.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. काही महावितरण कर्मचारी आणि संघटनांचे प्रतिनिधी सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संबंधित कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सर्वांची बाजू ऐकून घेत कारवाईचं आश्वासन दिलं. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.