“तेरावे धम्मपुष्प संपन्न”
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०
मुंबई- मुंबईतील सायन कोळीवाडा
विभागातील शांतीदुत बौध्दजन सेवा संघ (रजि.) नवरत्न महिला मंडळ आणि ई – ९ चाळ कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बौध्दाचार्य जितेंद्र स. कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले
“२०२२ वर्षावास प्रवचन मालिका” मधील तिसरे सत्रातल तेरावे धम्मपुष्प सोमवारी दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी
सायन कोळीवाडा विभागातील समाज मंदिर हॉल जवळील बिएमसी बिल्डिंग क्र. ई-९ समोरील “शांतीदुत बुध्द विहार” येथे समाजातील वाढत्या गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचारावर निर्बंध घालण्यासाठी, नैराश्यातून होणा-या गुन्हेगारी वर आळा घालण्यासाठी भारतीय संविधानिक अधिकारसह उपाययोजना यावर आधारित “सामान्य नागरिक आणि त्याचे संविधानिक अधिकार” या विषयावर ॲन्टॉप हिल पोलिस स्टेशनचे निर्भया पथक प्रमुख आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राऊळ मॅडम यांनी सर्व साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात वाढत्या घरगुती तंटासह मानवी अधिकारसह कर्तव्य आधारित प्रबोधन केले.
तसेच, वाढत्या कुमारिका माता आणि मोबाईल च्या दुष्परिणामांची जाणिव करुन दिली. तर ॲन्टॉप हिल पोलिस स्टेशनचे सायबर सेल प्रमुख पोलिस उपनिरीक्षक वाघ सरांनी आधुनिक काळातील मोबाईलच्या वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात माहिती देताना शालेय विद्यार्थी वर्गाला मोबाईल वापराची मर्यादा, श्रमिक वर्गाला आर्थिक आमिष फसवणूक संदर्भात जागरूक नागरिक म्हणून कशी दक्षता घ्यावी? यासंदर्भात मार्गदर्शन केले.
ह्यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती, सायन कोळीवाडा विधानसभा च्या अध्यक्षा वत्सलाताई हिरे यांनीही स्थानिक पातळीवर घ्यावयाची काळजी ह्यावर मौलिक विचार मांडले. शेवटी सर्वाचे आभार मानत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचा दाखला देत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचशीलाची तत्वप्रणाली वर आधारित निर्माण केलेले भारतीय संविधानाची आधुनिक काळातील महत्व समजावून सांगितले. त्यानंतर सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ बहाल करून सन्मानित करत सामुदायिक सरणंत्तय् गाथा घेऊन धम्मपुष्पाचे संमापण करण्यात आले. आलेल्या सर्व उपासक वर्गाला बाल उपासिका कुमारी सावी सचिन पवार हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अल्पोपहार वाटप करुन समारोप करण्यात आला.