एन. जे. पटेल महाविद्यालयात NSS दिवस साजरा

एन. जे. पटेल महाविद्यालयात NSS दिवस साजरा

एन. जे. पटेल महाविद्यालयात NSS दिवस साजरा

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर : 9860020016

भंडारा : – मोहाडी येथील एन जे पटेल महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छतेतून श्रम संस्कार कल्पना राबविली. स्थापना दिवसा च्या मुख्य कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ महेशकुमार भैसारे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संत व समाजसेवकांचे राष्ट्राच्या जडण घडणीत योगदान सांगून रा से यो च्या स्थापने चा इतिहास, उद्दिष्टे,व्यक्तिमत्व विकास, समाजसेवा, राष्ट्रसेवा व स्वयंसेवकांची जबाबदारी समजावून सांगितली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून व साने गुरूजी यांच्या ‘खरा तो एकची धर्म ‘या प्रार्थनेने करण्यात आली. डॉ पवार सर यांनीही रा से यो च्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. डॉ वरकडे सरांनी शिस्तीचे महत्व सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ पांडे मॅडम यांनी युवकांची जबाबदारी व सेवा करण्याची तत्परता आवश्यक असल्याचे म्हटले. शेवटी केक कापून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ राऊत मॅडम, प्रा. जाधव सर, डॉ चवळे सर, रा से यो स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुहानी मेश्राम तर आभार प्रदर्शन श्वेता सार्वे हिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here