सम्राट विजय व्यायाम शाळेतील मल्ल ज्ञानेश्वर दिलीप भोगे यांचीअखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धा दिल्ली येथे निवड

शिर्डी प्रतिनिधी

संजय महाजन

याहाळोद येथील सम्राट विजय व्यायाम शाळेतील मल्ल ज्ञानेश्वर दिलीप भोगे यांचीअखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धा दिल्ली येथे निवड झाली आहे.

 न्याहाळोद येथील माजी सरपंच दिलीप जगन्नाथ भोगे यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर भोगे यांनी याआधी खुले अधिवेशन कुस्ती स्पर्धेत तसेच शालेय कुस्ती स्पर्धेत व यूनिवर्सिटी मार्फत विविध पदके मिळवले असून ते न्याहाळोद येथे पोस्टमन म्हणून काही वर्ष कार्यरत होते त्यांना पदोन्नती मिळाल्याने मनमाड पोस्टल सर्कल येथून ते कार्यरत असून त्यांनी मनमाड येथून कुस्ती स्पर्धा (all India पोस्टल रेसलिंग टुर्नामेंट) अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा (all Inwdia सिव्हिल सर्व्हिसेस रेसलींग टुर्नामेंट) साठी निवड होऊन कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र पोस्टल सर्कल लेव्हल स्पर्धेतून लखनौ येथे होणाऱ्या अखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धे साठी निवड झाली होती .तसेच ठाणे येथे झालेल्या all India सिव्हिल सर्व्हिसेस च्या निवड चाचणीत निवड होऊन दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धे साठी त्यांची नुकताच निवल झाली आहे.

        स्पर्धेस नागरगोजे अधीक्षक RMS भुसावळ, नेहरकर साहेब, विकास पाटिल शेखर शिंदे मुंबई, आदींचे मार्गदर्शन लाभले असून MC पितळे , PT वैद्य, KG नरवाडे, sv सावंत,AK चौधरी. (मनमाड रेल्वे मेल सर्व्हिस, भारतीय डाक) आदींचे सहकार्य सम्राट व्यायाम शाळेचे संस्थापक व माजी उपसरपंच देविदास जिरे आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here