सौ. योगिनी राजेंद्र पोतदार यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

20

सौ. योगिनी राजेंद्र पोतदार यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

मुंबई: शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने “क्रांतीज्योती साववित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते.

पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या घाटकोपर येथील विद्याभवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ. योगिनी राजेंद्र पोतदार यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे सन २०२४-२५ चा ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी टाटा थिएटर, एन. सी. पी. ए. हॉल येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि शिक्षणमंत्री मा. श्री. दादा भुसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

सौ. पोतदार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करून विद्यार्थी पटसंख्या वाढ, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, मागील २५ वर्ष दहावीचा सतत १००% निकाल, डिजिटल स्कूल, सुसज्ज लॅब, ग्रंथालय अशा अनेक सुविधा विद्याथ्र्यांना दिल्या.

प्राचार्य सौ. योगिनी राजेंद्र पोतदार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी विद्याभवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत मुंबई उपनगर जिल्हयात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रु. ११,००,०००) मिळाले. प्राचार्य सौ. योगिनी राजेंद्र पोतदार यांच्या सुयशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.