नवरात्रोत्सवानिमित्त न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेत मोफत डोळे तपासणी शिबिर
ठाणे : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने न्यू प्रगती शैक्षणिक संस्था, ठाणे यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मुलुंड महाडा कॉलनी, पत्राचाळ, पश्चिम धांगडपड, संभाजीनगर, मुलुंड आदी वस्त्यांमधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिरादरम्यान काही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले असून सामाजिक जाणिवा वृद्धिंगत झाल्या. उपस्थित पालक व नागरिकांनी अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. अनेकांनी सांगितले की, संस्थेमुळे समाजातील सामान्यांना प्रत्यक्ष मदत मिळत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष गणेश दिनकर खरात, उपाध्यक्ष सुनील कांबळे, खजिनदार चंद्रकांत सोनवणे, उपसचिव महेश गडांकुश, सभासद महेश खरात, सपना शिवमरे, सारिका गड, अंकुश, दीक्षा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थापक संचालिका अनिता दिनकर खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
संस्थेचे सल्लागार विजय काळे, हिरामण गोरेगावकर, सुनिता सोनवणे यांनी शिबिराच्या आयोजनात विशेष परिश्रम घेतले.
न्यू प्रगती शैक्षणिक संस्था केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे. या संस्थेचे सामाजिक उपक्रम नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे.