खासदार सुनिल तटकरे यांचा आज म्हसळा तालुका दौरा.

20

खासदार सुनिल तटकरे यांचा आज म्हसळा तालुका दौरा.

पक्ष प्रवेश आणि लोकपयोगी विकास कामांचे करणार लोकार्पण आणि भूमिपूजन

म्हसळा :संतोष उध्दरकर

म्हसळा:राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यमातून म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामांना गती आली असून दिनांक २५ सप्टेंबर रोजी राज्याच्या महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एकाच दिवशी १२ गावांत २० मंजुर कामांचे भूमिपूजन केले त्यांनी केलेल्या दौऱ्या पाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष,रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांचा नियोजित म्हसळा तालुका दौरा असुन रविवारी दिनांक २८/०९/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत
सुरई बौद्धवाडी येथील ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.सकाळी ११.३० वाजता शहरातील होळीचे पटांगण सुशोभीकरण करणे २० लक्ष रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन,दुपारी १ वाजता तालुका कुणबी समाज पश्चिम विभाग मध्यवर्ती सामाजिक सभागृह बांधकामाचे पानवे येथे लोकार्पण सोहळा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी कळवले आहे.