Home latest News ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त ‘विधिमंथन २०२५’ उत्साहात...
ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त ‘विधिमंथन २०२५’ उत्साहात संपन्न!
“मूलभूत तत्व हीच कायद्यांचा पाया आहेत” – न्यायाधीश राजेंद्र सावंत यांचे प्रतिपादन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- जनता शिक्षण मंडळाचे ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग, या महाविद्यालयाच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीसंदर्भात ‘विधिमंथन २०२५’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. २७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून रायगडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश .राजेंद्र सावंत , चित्रलेखा पाटील आणि प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र अभ्यासक तथा ललित लेखक डॉ. अविनाश कोल्हे उपस्थित होते.
याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, कार्यवाह गौरव पाटील जनता शिक्षण मंडळाचे इतर पदाधिकारी रायगड व अलिबाग बार असोसिएशनचे पदाधिकारी ॲड. प्रविण ठाकूर, महाविद्यालयातील प्राध्यापक जे.एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, माजी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रा. सुरेंद्र दातार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम म्हात्रे यांनी केले.
जयवंत केळुसकर सभागृहात कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत माहितीपट सादरीकरण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या युट्यूब चॅनलचेही उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे शैक्षणिक उपक्रम अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक सादर करताना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी आपल्या शैक्षणिक आणि वकिली अनुभवांचा दाखला देत, विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण आणि समाजकारणातील महत्त्व समजावून सांगितले. प्रमुख पाहुण्या चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भविष्यातील वाटचालीस प्रोत्साहन दिले. त्यांनी कायदेशीर शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व विषद केले. प्रमुख उद्घाटक राजेंद्र सावंत यांनी आपल्या भाषणात लॉ कॉलेजशी आणि अलिबागशी असलेली त्यांची जुनी नाळ सांगितली. त्यांनी या भूमीशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. कायद्याचा आणि संविधानाचा पाया हे महाविद्यालयात शिकवले जाणारी ची मूलभूत तत्व आहेत यांच्यावरच आधारित असतो असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ” न्याय मंथन”- अभिरूप न्यायालय स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयाच्या २५ व्या वर्षापूर्तीनिमित्त जनता शिक्षण मंडळाचे संचालक मा. संजय पाटील यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या विकासासाठी आणि पुस्तक खरेदीसाठी एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्द केला . कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.