*काँग्रेसने सत्तर वर्षात कमविलेली देशाची अर्थव्यवस्था भाजपाने सात वर्षात विकून देशावर महागाईची साडेसाती आणली.* – खासदार,मा. बाळूभाऊ धानोरकर *पक्षाचे खरे ध्येयधोरण, विकास कामे, काँग्रेसची विचारधारा सढलपणे पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांना करावं.* – आमदार, मा.सुभाषभाऊ धोटे

44

*काँग्रेसने सत्तर वर्षात कमविलेली देशाची अर्थव्यवस्था भाजपाने सात वर्षात विकून देशावर महागाईची साडेसाती आणली.*
– खासदार,मा. बाळूभाऊ धानोरकर

*पक्षाचे खरे ध्येयधोरण, विकास कामे, काँग्रेसची विचारधारा सढलपणे पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांना करावं.*
– आमदार, मा.सुभाषभाऊ धोटे

*काँग्रेसने सत्तर वर्षात कमविलेली देशाची अर्थव्यवस्था भाजपाने सात वर्षात विकून देशावर महागाईची साडेसाती आणली.* - खासदार,मा. बाळूभाऊ धानोरकर *पक्षाचे खरे ध्येयधोरण, विकास कामे, काँग्रेसची विचारधारा सढलपणे पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांना करावं.* - आमदार, मा.सुभाषभाऊ धोटे
*काँग्रेसने सत्तर वर्षात कमविलेली देशाची अर्थव्यवस्था भाजपाने सात वर्षात विकून देशावर महागाईची साडेसाती आणली.*
– खासदार,मा. बाळूभाऊ धानोरकर
*पक्षाचे खरे ध्येयधोरण, विकास कामे, काँग्रेसची विचारधारा सढलपणे पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांना करावं.*
– आमदार, मा.सुभाषभाऊ धोटे

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी : दिनांक २६/१०/२०२१ रोजी मंगळवार ला गोंडपिपरी येथील कन्यका मंदिर सभागृहात चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार मा. बाळूभाऊ धानोरकर व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांचे प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा हजारोंच्या उपस्थित उत्साहाने पार पडला.
काँग्रेस नी देशाला ७० वर्षे सांभाळत अर्थव्यवस्थेचा पाया रचला होता.याच अर्थव्यवस्थेला सात वर्षात देशोधडीला लावण्याचे काम भाजपाने केले आहे.सात वर्षाची साडेसाती म्हणजे भाजप अशी भरभरून टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली.केंद्र सरकारच्या सात वर्षाच्या कालखंडात पेट्रोल डिझेल शंभरी पार केले तर गॅस हजारी पार केलेली आहे.शेतकऱ्यांची फसवेगिरी जाणूनबुजून केल्या जात आहे.आवश्यकतेनुसार तेलाच्या दरवाढीच्या तुलनेत सोयाबीनला भाव नाही.कोणत्याही शेतीमालाला महागाईच्या दराने भाजप सरकार रास्त भाव देत नसून, शेतकरी,मजूर, गरीब,बेरोजगार तरुण यांची परस्पर फसवणूक देशातील केंद्र सरकारने सात वर्षात केलेली आहे.अशी घणाघाती टिका खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या भाषणातून केली.
अध्यक्षीय भाषणातून आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, विधानसभेचा आमदार म्हणून काम करत असताना सर्वांगीण विकास करण्याचे ध्येयधोरण सतत अवलंबित आहे. विकास कामे होत असताना त्याची प्रचिती, आणि काँग्रेसची विचारधारा कार्यकर्त्यांनी सढलपणे पोहचविण्याचे काम केले पाहिजे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला निस्वार्थपणे सहकार्य राहील.राज्यात पालकमंत्री,खासदार, आमदार आपली सत्ता असल्याने भागातील विकासकामे करीत असताना जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषद अश्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये काँग्रेसला मताधिक्य मिळाले पाहिजे.यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने संघटन मजबूत करून विजय संपादन करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे.सोबतच विकासकामे करत असताना तालुक्याकडे दुर्लक्ष करणार नसल्याची ग्वाही आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री.संतोषजी रावत यांनी प्रसंगी म्हणाले की, राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा फडकणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर कार्यकर्त्यांनी घासून लक्ष केंद्रित केले पाहिजे.”अभी नही तो कभी नहीं”असे उद्गार काढत जिल्ह्यातील मध्यवर्ती बॅंकांच्या योजनांचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे असे आवाहन केले.
राजुराचे नगराध्यक्ष श्री. अरुणभाऊ धोटे यांनी सुध्दा आपले मत व्यक्त करत मार्गदर्शन केले.मेळावा हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. तुकेशजी वानोडे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यानी खासदार व आमदार यांच्या कार्यप्रणालीवर विस्वास ठेऊन काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
मेळाव्यास प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री.संतोष रावत, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. अरुण भाऊ धोटे, बाजार समितीचे सभापती श्री. सुरेश राव चौधरी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, अभिजीतदादा धोटे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, महिला तालुकाध्यक्ष रेखाताई रामटेके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष बंडावार, बाजार समिती माजी उपसभापती अशोक रेचनकर, देविदास सातपुते, प्राध्यापक शंभूजी येलेकर, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष विनोद भाऊ नागापुरे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गौतम झाडे, राजीव सिंह चंदेल, सपना साखलवार, सचिन फुलझेले, रफिक शेख, तूकेश वानोळे, नामदेव सांगळे, अनिल कोरडे, जितेंद्र गोहने, बालाजी चनकापुरे, रामचंद्र कुरवटकर, बसंत सिंग, हरमेल डांगी,संजय झाडे, धीरेंद्र नागापुरे, साईनाथ कोडापे, गयाबाई डोके, वनिता वाघाडे, निधी चौधरी,तालुका काँग्रेस कार्यकर्ते,युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, शहर काँग्रेस कार्यकर्ते, महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या, अनुसूचित जाती विभाग, किसान सेल, अल्पसंख्यांक, एन एस यु आय, व विविध काँग्रेस विभागाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि गोंडपिपरी तालुक्यातील परिसरातील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.
सूत्रसंचालन श्री. सचिन फुलझेले यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष सौ. रेखाताई रामटेके यांनी केलं आणि बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. अशोक रेचनकर यांनी आभार मानले.
तालुका प्रसिध्दी प्रमुख गोंडपिपरी