बामनवाड्यातील अवैध्य दारू विक्री बंद करा* राजुरा पोलिसांना आठ दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा श्रमिक एल्गार घेणार भूमिका

44

*बामनवाड्यातील अवैध्य दारू विक्री बंद करा*

राजुरा पोलिसांना आठ दिवसाचा अल्टिमेटम

अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा

श्रमिक एल्गार घेणार भूमिका

बामनवाड्यातील अवैध्य दारू विक्री बंद करा* राजुरा पोलिसांना आठ दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा श्रमिक एल्गार घेणार भूमिका
बामनवाड्यातील अवैध्य दारू विक्री बंद करा*
राजुरा पोलिसांना आठ दिवसाचा अल्टिमेटम
अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा
श्रमिक एल्गार घेणार भूमिका

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे अवैध्य दारू विक्री जोरात सुरू असून पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने सदर दारूविक्री सुरू असल्याने गावकऱ्यांना दारू विक्री बंद करण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे महिलांना, मुलींना नाहक त्रास होत असून अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जात आहेत. मात्र राजुरा पोलीस मुंग गिळून चूप असून कोणतीही कार्यवाही करीत नसल्याची माहिती समोर आली असून पोलिसांच्या आशीर्वादाने दारू विक्री सुरू आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

आठ दिवसात बामनवाडा येथील होत असलेली दारू विक्री बंद करावी अशी मागणी श्रमिक एल्गार संघटनेने केली असून येत्या आठ दिवसात अवैध्य दारू विक्री बंद न केल्यास राजुरा पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करणार अशी भूमिका श्रमिक एल्गार संघटनेने घेतली असून याबाबत राजुरा पोलीस स्टेशनला निवेदनही घनश्याम मेश्राम यांनी दिला आहे.

मात्र राजुरा पोलीस सदर निवेदनाची व गावातील नागरिकांच्या भावनांची दखल घेऊन गावातील अवैध्य दारू विक्री बंद करतील काय? असा प्रश्न बामनवाडा येथील नागरिकांना पडला आहे.