राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात 2 हजार 240 हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन

49

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हयात 2 हजार 240 हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील संबंधित तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या पिक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड श्रीमती उज्जला बाणखेले यांनी केले आहे.

जिल्ह्याचे रब्बी एकूण पेरणी क्षेत्र 14035 हेक्टर असून यामध्ये हरभरा 1076 हेक्टर् व मुग 2460 हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. या पेरणी क्षेत्रानुसार सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हयात हरभरा पिक 1275 हेक्टर व मुग 965 हेक्टर असे एकूण 2240 हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे. या पिक प्रात्यक्षिकाकरीता राष्ट्रीय बिज निगम लि. तसचे महाबीज यांच्या मार्फत हरभरा बियाणे 892.5 क्विंटल व मुग बियाणे 144.75 क्विंटल असे 2240 हेक्टर कडधान्य पिक प्रात्यक्षिक क्षेत्रासाठी 1037.25 क्विं.बियाण्याचा तालुकास्तरावर पुरवठा करण्यात आला आहे. बियाणे पुरवठ्या बरोबरच प्रक्रियामध्ये रायझेबियम व पीएसबी, एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये-फेरोमन ट्रॅप्सल्यअर्स किटकनाशक, बुरशी नाशक, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये सुक्ष्म मुलद्रव्ये इ. निविष्ठांचा 100 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे.