टेमपाले येथील महिला भगिनींनी आमदार भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेऊन दिला पाठिंबा.

टेमपाले येथील महिला भगिनींनी आमदार भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेऊन दिला पाठिंबा.

टेमपाले येथील महिला भगिनींनी आमदार भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेऊन दिला पाठिंबा.

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :- रविवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी टेमपाले येथील मुस्लिम महिला भगिनींसह अन्यही महिलांनी महाड – पोलादपूर, माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या महाड तालुक्यातील ढालकाठी येथील निवासस्थानी जाऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देवून ही बहीण कायमच तुमच्या पाठीशी ऊभी राहील असा शब्द उपस्थित महिलांनी आमदारांना दिला आहे.टेमपाले येथील रस्ता, धान्य दुकान अशी जी काही कामं आहेत ती पुर्ण करुन द्यावीत अशी मागणी करण्यात आली. त्यावर बोलताना आपली जी जी काही विकास कामे आहेत ती एक भाऊ या नात्याने मी नक्कीच पुर्ण करुन देणार असल्याचा विश्वास आमदार भरतशेठ गोगावले यांनी या प्रसंगी उपस्थित महिलांना दिला.

दरम्यान टेमपाले येथील मुस्लिम भगिनींसह अन्यही महिलांचा आपल्या ला मिळत असलेला जाहीर पाठिंबा बघुन आमदार भरतशेठ गोगावले हे काहीशे गहिवरले.आपण आपल्या मतदारसंघात करीत असलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणुनच आज मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्मांतील लोक,महीला भगिनी आपल्या पाठीशी उभ्या राहत आहेत तसेच जाहीर पाठिंबा देत आहेत या माझ्या सर्व माता भगिनी, मतदारसंघातील जनता या सर्वांचे रुण आपण विकास कामांच्या माध्यमातून फेडणार असल्याची भावनाविवश प्रतिक्रिया आमदार भरतशेठ गोगावले यांनी दैनिक रायगड टाइम्सशी बोलताना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here