सांगली चुलती व पुतण्याची किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या.
चुलती आणि पुतण्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हातनूर येथे घडला असून यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे गूढ वाढत चालले आहे.
तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा सुतार या विवाहितेने पहाटे चारच्या सुमारास राहत्या घरात अज्ञात कारणाने कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना उपचारासाठी तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बुधवारी पहाटे जयदीप सुतार हा त्याच्या वडिलांना घराबाहेर निपचित पडलेला आढळला. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी गावातील एका डॉक्टरांना बोलावून तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तासगावच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तासगावातील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. याबाबत तासगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.








