ब्रम्हपुरी-आरमोरी चौकात अवैध प्रवासी वाहणाने वाहतुकीची कोंडी.

58

ब्रम्हपुरी-आरमोरी चौकात अवैध प्रवासी वाहणाने वाहतुकीची कोंडी

निष्पाप लोकांचा कधी बळी तर दररोज होतात किरकोळ अपघात.

 

ब्रम्हपुरी-आरमोरी चौकात अवैध प्रवासी वाहणाने वाहतुकीची कोंडी
ब्रम्हपुरी-आरमोरी चौकात अवैध प्रवासी वाहणाने वाहतुकीची कोंडी

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- दैनंदिन जीवनात प्रवास हा महत्वाचा भाग, सुखमय प्रवास होवून आपण आनंदाने आपल्या ठिकाणावर पोहचावे हे सर्वांना अपेक्षित मात्र आरमोरी चौक ब्रम्हपुरी येथे लगतच्या गावखेड्या कडे जाणाऱ्यांची संख्या अधिक व शहरातील मध्यवर्ती भाग असल्याने नेहमी मोठी वर्दळ असते तर तिथे अवैध प्रवासी वाहनांची मोठी गर्दी होतं असल्याने, वाहतुकीची कोंडी निर्माण होतं ब्रम्हपुरी -आरमोरी चौक अपघात प्रवण स्थळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ब्रम्हपुरी हे मोठया बाजार पेठेचे ठिकाण असल्याने गाव खेड्याकडे जाणारे प्रवासी जास्त आणि परिवहन मंडळाचे वाहन कमी त्यातच महामंडळाचे सुरु असलेले संप अश्या अवस्थेत अवैध खाजगी प्रवासी वाहतूक वाहणांनी
डोके बाहेर काढले असून जास्तीत जास्त नागरीक नाईलाजास्तव खाजगी प्रवासी वाहणाने प्रवास करतांना बघायला मिळतात त्यामुळे आरमोरी चौकात खाजगी वाहणाचा भरमसाठ वावर दिसून येत आहे. तर त्यांच्यात आपआपसात होणाऱ्या स्पर्धेमुळे वाहने भरधावं वेगात चालवणे कधी रस्त्यावर प्रवासी चढवणे- उतरवणे असले गैरप्रकार होतं असल्याने तिथून जाण्या-येणाऱ्यांना नेहमी मोठा त्रास सहन करावा लागतो तर कधी प्रसंगी अपघाताचा सामना देखील करावा लागतो दररोज त्या ठिकाणी कधी मोठे तर कधी किरकोळ अपघात होत असतात तर काही प्रसंगात निष्पाप जीवाचे बळी गेल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत.

स्थानिक कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या जीविताशी संवेदनशील अश्या गंभीर प्रकरणावर प्रसंगावधान राखून वेळीच लक्ष देत कर्तव्यदक्षता दाखवावी व पूर्णवेळ वाहतूक शिपाई नियुक्त करून होणाऱ्या अपघातावर आळा घालून,वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होतं आहे.