गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय येथील सोनोग्राफी साठी आलेल्या गरोदर महिला गेल्या परत.

54

गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय येथील सोनोग्राफी साठी आलेल्या गरोदर महिला गेल्या परत.

भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविण्या अगोदर परिस्थिती जाणून घ्यावी.

वेदांत मेहरकुळे सदस्य रूग्ण कल्याण समिती नियमक मंडळ ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी यांनी असी विनंती केली आहे.

गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय येथील सोनोग्राफी साठी आलेल्या गरोदर महिला गेल्या परत.
गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय येथील सोनोग्राफी साठी आलेल्या गरोदर महिला गेल्या 

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दर शनिवारला सोनोग्राफी केल्या जाते. मात्र आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सोनोग्राफी डॉक्टर न आल्यामुळे पस्तीस गरोदर महिला परत गेल्या. याबाबत आम्ही ग्रामीण रुग्णालयाकडून दिलगिरी व्यक्त करतो. परंतु या मागील कारण जानन्या अगोदरच गोंडपिपरी भाजपा पदाधिकाऱ्यांनी या विषयाला धरून अगोदरच निषेध नोंदविला व सोशल मीडियातून वायरल केल.

यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मी रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळ सदस्य म्हणून पुढे येत आहे. आज सोनोग्राफी डॉक्टर शारदा येरमे या अनुपस्थित होत्या. गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन कराली मात्र कायमस्वरूपी सोनोग्राफी डॉक्टर रुजू झाले नाही. तसेच खाजगी व्यवसायिक डॉक्टर शारदा येरणे यांना ग्रामीण रुग्णालया मार्फत प्रति सोनोग्राफी चारशे रुपये असे देण्यात येते. त्यांचेकडे गडचांदूर राजुरा गोंडपिपरी बल्लारशा व वेळ पडल्यास चंद्रपूर अशा पाच सोनोग्राफी सेंटरची जबाबदारी आहे. त्या खाजगी व्यवसायिक डॉक्टर असल्याने त्यांना कुठल्याही प्रकारचे बंधन नसल्याने व त्यांच्या वैयक्तिक अडचणी व इतर बाबी यासंबंधी कुठल्याही पद्धतीने बंधन करणे शक्य नसेल आज त्या उपस्थित राहू शकत नाही असा पूर्वीच फलक दोन कॉपी ग्रामीण रुग्णालयात लावण्यात आला होता. मात्र शनिवारी हा ठराविक सोनोग्राफी साठी दिवस ठरविल्याने कोणीही पूर्वकल्पना किंवा पूर्व चौकशी न करता थेट ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीसाठी गरोदर महिला आल्या व त्यांना परत जावे लागेले. हा प्रकार जरी खेदजनक असला तरी मात्र कायमस्वरूपी सोनोग्राफी डॉक्टर नसल्याचा अभाव आज प्रत्यक्षात जाणवला. आज घडलेल्या प्रकाराबाबत यूपी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप बांबोडे यांच्याशी संवाद साधला असता सोनोग्राफी मशीन ऑपरेट करताना ज्या डॉक्टरांचे नाव असेल तेच डॉक्टर ऑपरेट करू शकतात असे त्यांनी कळविले तसेच डॉक्टर शारदा येरमे या खाजगी व्यावसायिक प्रॅक्टिशनर असल्याने त्यांना बंधनकारक नियम घालवणे शक्य नाही. असे कळविले. तरी सन्मानीय भाजप पदाधिकाऱ्यांनी आज घटलेल्या या प्रकाराचा निषेध नोंदवणे ऐवजी आम्ही केलेल्या मागणीप्रमाणे आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ स्तरावर स्थायी सर्व सोनोग्राफी डॉक्टर देण्याची मागणी घालावी. व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी एकत्रित येऊन लढावे अशी या प्रमाणे मी अपेक्षा करतो अशी आशा वेदांत मेहरकुळे सदस्य रुग्ण कल्याण समिती नियमक मंडळ ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी यांनी केली आहे