कारंजा तहसील कार्यालयात प्रहारचे ठिय्या आंदोलन.

50

कारंजा तहसील कार्यालयात प्रहारचे ठिय्या आंदोलन.

विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांना घेऊन अक्षय भोणे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आंदोलन.

कारंजा तहसील कार्यालयात प्रहारचे ठिय्या आंदोलन.
कारंजा तहसील कार्यालयात प्रहारचे ठिय्या आंदोलन.

✒️कारंजा घाडगे प्रतिनिधी✒️
कारंजा/वर्धा:- गेल्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बस सेवा ही कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद आहे. या कामबंद आंदोलनामुळे याचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना बसत आहे. आधीच कोरोना वायरस महामारीच्या काळात विद्यार्थ्याचे दोन वर्षाचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आज येवढ्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. खासगी वाहन चालक मोठ्या प्रमाणात भाडे आकारून विद्यार्थ्यांची व पालकांची आर्थिक लूट करीत आहे. त्यांना तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार यांनी आळा घालावा व विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी याकरिता तहसीलदार कारंजा घाडगे यांना निवेदन देण्याकरिता प्रहारचे अक्षय भोणे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी तहसील कार्यालयावर धडकले असता तहसीलदार मात्र गैरहजर होते. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन आरंभ केले. शेवटी तहसीलदार कार्यालय न आल्याने नायब तहसीलदार राऊत यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. व चर्चा केली.

त्यावेळी तहसीलदार यांनी आम्ही लवकरच सदर प्रकरणी अँक्शन प्लॅन तयार करून विद्यार्थ्यांना या त्रासातून मुक्त करू असे आश्वासन दिले. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

यावेळी अक्षय भोने, रोहित घागरे, तुषार मस्की, हिमांशू लहाबर, योगेश घोडे, सूरज बेलखळे, कुंदन देवसे, प्रितम पांचाळ, गौरव गोरे, अमोल चोपडे, विलास चौधरी, कैलास चोपडे, यश डोगरे, रोहित किनकर, सूरज चोपडे, अमित चौधरी, उदय चिकने, लोकेश खवशी, उज्वल घोडाम आणि प्रहार कार्यकर्ते व कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.