हिंगणा पंचायत समितीवर राष्ट्रवादी चा झेंडा! रुपाली खाडे यांची सभापती पदी निवड.

56

हिंगणा पंचायत समितीवर
राष्ट्रवादी चा झेंडा!
रुपाली खाडे यांची सभापती पदी निवड.

हिंगणा पंचायत समितीवर राष्ट्रवादी चा झेंडा! रुपाली खाडे यांची सभापती पदी निवड.
हिंगणा पंचायत समितीवर
राष्ट्रवादी चा झेंडा!
रुपाली खाडे यांची सभापती पदी निवड.

देवेंद्र सिरसाट.
(हिंगणा तालुका जिल्हा नागपूर)
9822917104

काल दिनांक 26 नोव्हेंबर 2021ला,
पार पडलेल्या हिंगणा पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली प्रवीन खाडे यांची निवड झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सद्स्य संख्या नऊ होती तर भाजप कडे पाच सदस्य होते, रुपाली खाड हिंगणा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या रुपाली खाडे यांनी 14 पैकी 9 मतं घेत विजय मिळवला तर त्यांच्या प्रतीस्पर्धी भाजपाच्या उमेदवार शोभा आष्टनकर यांना 5 मतांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये पंचायत समिती सदस्य रुपाली खाडे, सुषमा कावळे,सुनील बोंदाडे, आकाश रंगारी, राजेंद्र उईके, उमेश राजपूत, पोर्णिमा दीक्षित,अनुसया सोनावाणे, आणि कांग्रेस पक्षाच्या वैशाली काचोरे,आदींचा समावेश होता
विजयी सभापती रुपाली खाडे यांनी आपल्या विजयाचे श्रेय माजी मंत्री रमेशचंद्र बंग व माजी आमदार विजय घोडमारे पाटील यांना दिले असून माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जि.प. राकापा गटनेते दिनेश बंग, जि.प. सदस्य रश्मी कोटगुले, यांनी पुष्प गुच्छ देऊन नवनिर्वाचित सभापती चे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून फटाक्याची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, उपसभापती योगेश सातपुते,खरेदी-विक्री संस्था हिंगणा चे सभापती श्यामबाबू गोमासे, राकापा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, राकापा महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर, सरपंच रवींद्र आदमने, दिनेश ढेंगरे, युसूफखा पठाण, प्रेमलाल चौधरी, मुलचंद चौहान, लक्ष्मण घवघवे, कुंदन निघोट, विजू बोटरे, महेंद्र गोरामन, नाना शिंगारे, विलास वाघ, दिलीप काळबांडे, सरला लोखंडे,गोवर्धन प्रधान, प्रदीप कोटगुले, सुशील दीक्षित, लीलाधर दाभे,राजाराम पांडे, रामचंद्र डेकाटे, मुकेश पाल, प्रमोद फुलकर, गुणवंता चामाटे, विजय काचोरे, मिलिंद काचोरे, पंढरीनाथ खाडे, भाष्कर जगताप, गोकुळदास मिनियार,जयराम राठोड प्रमोद पन्नासे, सुधाकर खोडे, आदी सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.