आनंद बुद्ध विहारात संविधान दिन साजरा

देवेंद्र सिरसाट.
(हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
तालुक्यातील गजानननगर येथील आनंद बुद्ध विहारात भारतीय संविधान प्रस्तावनेच्या पठनासह विविध कार्यक्रमानी संविधान दिन साजरा करण्यात आला.
या वेळी जेष्ठ पत्रकार तथा आनंद बुद्ध विहाराचे प्रमुख लिलाधर दाभे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर विहार समिती कोषाध्यक्ष नरेश गोंडाने, सचिन अविनाश राऊत, मुख्यध्यापिका वसुंधरा पाठक, सौ. गोंडाने, सौ. राऊत, बडोले, चिंतामण सोमकुवर, विनोद साखरे आदींसह बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.