भारतीय बौद्ध महासभा तालुका कळमेश्वरच्या वतीने ब्राह्मणी कळमेश्वर येथे संविधान दिन साजरा.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲
कळमेश्वर,26 नोव्हें:- भारतीय बौद्ध महासभा तालुका कळमेश्वरच्या वतीने ब्राह्मणी कळमेश्वर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला होता. त्यादिवसाचे औचित्य साधून देश भरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येते. ज्या संविधानामुळे सर्व भारतियांना समान हक्क आधिकार प्राप्त झाले. न्याय, हक्क, अधिकाराच्या पायावर हा स्वतंत्र भारत देश उभा आहे त्या संविधान आणि त्यांच्या शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महान कार्याला नस्तमस्तक होण्याचा हा दिवस.
ब्राह्मणी कळमेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विकास जामगडे यांनी पुष्पहार घालुन त्यानंतर तक्षशिला बुद्ध विहार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभा तालुका सरचिटणीस राहूल वानखेडे हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या भाषणात संविधानावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर व संविधान यांचा जयघोष करण्यात आला.
संविधान दिनाच्या या कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अरून वाहने यांनी केले. यावेळी माजी सदस्य ग्रामपंचायत ब्राह्मणीची वैशाली वाहणे यांनी संविधानाची उद्देशिका प्रदान केल्या. तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या अध्यक्षा अर्चनाताई उके, ब्राह्मणी ग्रामपंचायतच्या माजी सदस्या वैशालीताई वाहणे, तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या सचिव शशिकलाताई चणकापूरे, कोषाध्यक्ष दर्शनाताई झांबरे, उपाध्यक्ष लताताई खडसे कार्यकारिणी सदस्य सुलोचना वाहने, भारती बन्सोड, ललिता खोब्रागडे या प्रामुख्याने उपस्थित होत्या.