बल्लारपूर वनपरिक्षेत्राचे कारवा बिटात वाघीण मृताअवस्थेत आढळून आल्याने खळबळ

58

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर -सविस्तर वृत्त असे आहे की मध्य चांदा वनविभागाचे बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या करावा नियत वनक्षेत्राचे कक्ष क्रमांक 500 मध्ये एक मादी वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे वन विभागाचे कर्मचारी मोक्यावर जाऊन पंचनामा केला असता मादी असलेली ही वाघीण अंदाज 5 ते 6 वर्षाची असून तीन चार दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज सांगण्यात येत आहे मृत्यूचे नेमके कारण माहीती झाले नसून वाघाचे सम्पूर्ण अवयव शाबूत असून यांची वैद्यकीय चौकशी नंतरच कारण सांगता येईल असे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांनी सांगितले