भारतीय 'संविधान दिन' आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजर
भारतीय 'संविधान दिन' आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

भारतीय ‘संविधान दिन’ आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

भारतीय 'संविधान दिन' आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजर
भारतीय ‘संविधान दिन’ आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई:- भारतीय ‘संविधान दिन’ आणि भारतीय लोकसत्ताक संघटना वर्धापन दिनानिमित्त आयोजित संविधान गौरव दिन समारंभ साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघानी “लाॅकडाऊन काळातील ऑनलाईन शिक्षण पद्धीचा अभ्यास” या विषयावर शोध प्रबंध सादर केला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपस्थित अरविंद सोनटक्के सर,(जाॅइन्ट कमीशनर वित्त, गुजरात राज्य) समीर मोहीते सर (प्राध्यापक निर्मला निकेतन महाविद्यालय), अमोलकुमार बोधिराज सर (अध्यक्ष-भारतीय लोकसत्ताक संघटना), विलास कांबळे (कामगार नेते, सरचिटणीस -डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती सायन मुंबई, सुबोध सकपाळ (अध्यक्ष-आदर्श सामाजिक प्रतिष्ठान ) सिद्धार्थ जाधव (सरचिटणीस-आदर्श सामाजिक प्रतिष्ठान ), सुषमा कांबळे (अध्यक्ष-तक्षशिला महिला मंडळ), प्रदीप जाधव (२२ प्रतिज्ञा अभियान महाराष्ट्र राज्य संघटक) व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी संविधान व भारतीय लोकशाहीतील महत्व यावर मार्गदर्शन केले.

भारतीय 'संविधान दिन' आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

संविधान जागृती करीता घेण्यात आलेल्या महाराष्ट्रातून महिलांकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि मंगल डोळस. (नाशिक-प्रथम), सुरेखा कांबळे (दहिसर -द्वितीय), अमृता खेडेकर (मुंबई-तृतीय) असे पारितोषिक वितरण करण्यात आले. व ‘फेस पेंटिंग’ स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संविधान उद्देशीका प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

तसेच संपुर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या सुप्रिया मोहिते-जाधव यांनी केले. आणि आभार प्रदर्शन दिवाकर कदम यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली होती. वैभव मोहिते, विशाल गायकवाड, मनिष जाधव, जान्हवी सावर्डेकर, मितेश वळंजू, प्रेमसागर बागडे, अभिषेक कासे, सनी कांबळे, मंगेश खरात, संदीप आग्रे, योगेश मोरे, श्रेयस जाधव, कमलेश मोहिते, मयुरेश जंगम, रोहन कांबळे, नरेश कांबळे, स्वरांजली मर्चंडे, स्मृती कांबळे, स्मिता दाभोळकर, योगेश कांबळे, सचिन भालेराव, अजय मर्चंडे, विशेष सहभागी लोकसत्ताक स्टडी सेंटर येथिल सामाजिक कायदेशीर अभ्यासक विद्यार्थी हे देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here